JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'दीदींसोबत राष्ट्रगीत गाणं हे मोठं भाग्य', लता मंगेशकर यांच्या निधनानंतर कार्तिकी गायकवाड झाली भावुक

'दीदींसोबत राष्ट्रगीत गाणं हे मोठं भाग्य', लता मंगेशकर यांच्या निधनानंतर कार्तिकी गायकवाड झाली भावुक

सारेगमप लिट्ल चॅम्प्स (Saregampa Little Champs) फेम प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड (Karthiki Gaikwad) हिने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : ‘एखादी आजी (Grandmother) ज्याप्रमाणे आपल्या नातीला जवळ घेऊन त्याची विचारपूस करते, कौतुक करते, अगदी त्याचप्रमाणे लतादीदींनी मला जवळ घेऊन माझं कौतुक केलं होतं. लतादीदींकडून खूप काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. हे क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही,’ अशा शब्दांत सारेगमप लिट्ल चॅम्प्स (Saregampa Little Champs) फेम प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड (Karthiki Gaikwad) हिने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण केली. लतादीदींच्या निधनामुळे देशभर शोककळा पसरली आहे. दिग्गजांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. गायिका कार्तिकी गायकवाडने लतादीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आम्हा गायकांसाठी सरस्वती मातेचं रूप असलेल्या भारतरत्न लतादीदी आपल्या सर्वांना सोडून गेल्या, ही अतिशय दुखद घटना आहे. मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते, की लतादीदींच्या आत्माला शांती लाभो,’ अशा शब्दात तिने लता मंगेशकर यांनी आदरांजली वाहिली.

हे वाचा -  शाहरुख खानने लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी फुंकर मारण्यामागे इस्लामिक परंपरा

‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की बऱ्याचदा लतादीदींनी भेटण्याचा योग आला. त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. सारेगमप सुरू असताना लतादीदींना त्यांच्या घरी जाऊन भेटले होते. त्या वेळी एखादी आजी जसं नातीला जवळ घेऊन विचारपूस करते, कौतुक करते, तसंच त्यांनी माझं कौतुक केलं होतं. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी शिवसेनेचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आदरणीय लतादीदींसोबत राष्ट्रगीत सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत देवी सरस्वतीचरणी काही क्षण व्यतीत करता आल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते,’ अशी आठवणही कार्तिकीने शेअर केली.

हे वाचा -  लता मंगेशकर यांनी नुकतच गुलजार यांना दिलं होतं गिफ्ट! काय होतं विशेष?

‘लतादीदींची सर्वच गाणी अजरामर आहेत. त्यासोबतच त्यांनी गायलेल्या संतरचना, अभंग घरोघरी पोहोचले आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजातले हे अभंग अजरामर राहतील. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या वतीनेही मी लतादीदींना आदरांजली वाहते,’ असंही कार्तिकी म्हणाली. गानसम्राज्ञी भारतरत्न ( Bharat Ratna) लता मंगेशकर यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी (6 जानेवारी) मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या पार्थिवावर सायंकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, महाराष्ट्रात आज, सोमवारी (7 जानेवारी) एक दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या