JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'जे मी भोगले ते यांना भोगायला लावू नका, मुलींना कधी डान्सर करू नका...'

'जे मी भोगले ते यांना भोगायला लावू नका, मुलींना कधी डान्सर करू नका...'

‘मलाच माहितीये की डान्सर म्हणून मी काय सहन केलंय. प्रत्येकामध्ये एवढी सहन करण्याची ताकद नसते.'

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरियाणा, 03 जून- सपना चौधरीने हरियाणाची एक डान्सर ते बिग बॉस सेलिब्रिटी आणि त्यानंतर बॉलिवूडमधील अभिनेत्री हा प्रवास यशस्वीरित्या पार पाडला. बॉलिवूड कलाकारही तिच्या समोर हात टेकतील इतके तिचे डान्स शो इतके हिट होतात. आपल्या डान्स आणि व्यक्तिमत्वातून सपना ज्या पद्धतीने सर्वांसमोर आली आहे त्यानंतर प्रत्येकाला तिची कॉपी करावी असंच वाटतं. पण तिचं मात्र या सगळ्यावर वेगळंच मत आहे. सपनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती डान्सर होण्याचा तिच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. तसेच ती आपल्या चाहत्यांना कधीही डान्सर न होण्याचा सल्ला देतेय. चाहता असावा तर असा! चाहत्याने सलमानसाठी केलं हे खास काम सपनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती डान्स परफॉर्मन्सनंतर ती खाली बसून प्रेक्षकांशी गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी सपनाच्या जवळ लहान मुली येऊन त्यांच्यासोबत तिने डान्स करावा अशी विनंती करताना दिसतेय. या मुलींसोबत सपना फार प्रेमाने बोलतेय. पण मुलींच्या आई- वडिलांना ती मोलाचा सल्लाही देते. जर तुम्ही मुलीला डान्सर करण्याचं स्वप्न पाहत असाल तर असं अजिबात करू नका. हे सोपं नाहीये. शिका, मोठे व्हा नाव कमवा पण डान्सर होऊ नका. Death Anniversary : जिया खाननं आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं सपना पुढे म्हणाली की, ‘मलाच माहितीये की डान्सर म्हणून मी काय सहन केलंय. प्रत्येकामध्ये एवढी सहन करण्याची ताकद नसते. मला तर असं वाटतं की एक दिवस या जगातून डान्सर ही संज्ञाच नष्ट व्हावी.’ यानंतर सपना लहान मुलींना स्टेजवर बोलावते आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेते. वर्ल्ड कपसोडून बायकोसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय हा क्रिकेटपटू या व्हिडिओमध्ये सपनात्या मनातलं दुःख स्पष्ट दिसतं. लोकांच्या अवहेलना झेलत आणि त्यांच्याकडून आलेल्या अश्लिल प्रतिक्रियांचा सामना करत सपनाने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. बिग बॉसच्या घरात तिला ‘नाचणारी’ या शब्दात हिणवलं गेलं. पण या सगळ्याचा सपनाने मोठ्या हिंमतीने सामना केला. तिच्या याच गुणांमुळे देशभरात आज तिचे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लाखो चाहते आहेत. ——————– SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या