JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / चिन्मय उद्गीरकर नाही तर 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार शंकर महाराजांची भूमिका; प्रोमो पाहून येतील अंगावर शहारे

चिन्मय उद्गीरकर नाही तर 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार शंकर महाराजांची भूमिका; प्रोमो पाहून येतील अंगावर शहारे

अभिनेता चिन्मय उद्गीरकर हा शंकर महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं पहिल्या दिवसापासून बोललं जात होतं मात्र आता मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर याचा उलगडा झाला आहे.

जाहिरात

संग्राम समेळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी: कलर्स मराठी वाहिनीवर अनेक पौराणिक मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे योग योगेश्वर जयशंकर. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘योग योगेश्वर शंकर महाराज’ यांचा जीवनप्रवास उलगड्यात येत आहे.  महादेवाचा अंश असलेल्या योग योगेश्वर जयशंकर यांचा जीवनप्रवास  मालिकेतून दाखवण्यात येत आहे. आतापर्यंत शंकर महाराजांच्या बालपणातील गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र येत्या गुरूवार पासून प्रौढ वयातील शंकर महाराज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता चिन्मय उद्गीरकर हा शंकर महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं पहिल्या दिवसापासून बोललं जात होतं मात्र आता मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर याचा उलगडा झाला आहे. अभिनेता चिन्मय उद्गीरकर नाही तर आता अभिनेता संग्राम समेळ हा शंकर महाराजांची भूमिका साकारणार आहे. संग्राम नुकताच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दिसला होता. त्यानंतर आता तो योगयोगेश्वर जयशंकर या पौराणिक मालिकेत पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात शंकर महाराजांचा पुढचा प्रवास सर्वांसमोर येणार आहे. मोठ्या शंकर महाराजांच्या अवतारात अभिनेता संग्राम समेळ दिसत आहे. मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतोय.  श्री शंकर महाराज जीवनचरित्राच्या महाअध्यायाला आता आरंभ होणार आहे. 19 जानेवारी रोजी मालिकेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. संग्राम समेळ याने आतापर्यंत ललित २०५, बापमाणूस, आनंदी अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तो इन्स्पेक्टर जामखेडकरची भूमिका साकारली होती.  2021मध्ये संग्राम दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. श्रद्धा फाटक हिच्याशी त्यानं लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न हे अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याबरोबर झालं होतं. पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाली आणि मग या दोघांनी लग्नं केलं होतं. मात्र हे नात फार काळ टिकलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या