समांथा रुथ प्रभू
मुंबई, 10 जानेवारी : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकताच समांथाच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. शांकुतलम हा समांथाचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी समांथाला सुंदर साडीमध्ये पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे समांथा मायोसाइटिस या आजाराचा सामना करत आहे. काही दिवसांआधी तिनं तिच्या आजाराची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. आजारी असूनही तिनं काम सुरू ठेवलं आहे. एकीकडे ट्रिटमेंट सुरू असताना दुसरीकडे डबिंगचं काम समांथा करत होती. तिच्या आजाराची माहिती मिळताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. तर काहींनी तिच्या या आजाराची खिल्ली उडवली आहे. पण समांथानंही त्या युझरला चोख उत्तर दिलंय. समांथाच्या शांकुतलम या सिनेमाचा ट्रेलर लाँच वेळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. समांथा मायोसाइटिस आजाराचा सामना करत असताना काम करतेय. समांथाच्या फोटोवर एका युझरनं समांथाला सहानभूती दाखवत एक पोस्ट लिहिली. त्यानं म्हटलं, समांथासाठई मला खूप वाईट वाटत आहे. तिनं मायोसायटिसनंतर तिच्यातील आकर्षण आणि चमक गमावली आहे. घटस्फोटातून बाहेर आल्यानंतर आणखी स्ट्राँग झाली आहे आअसं वाटत होतं पण मायोसाइटिसनं समांथावर वाईटरित्या आघात केला आहे. ती फार कमजोर झाली आहे. हेही वाचा - Vivek Agnihotri : ‘यंदाचा ऑस्कर…’ विवेक अग्निहोत्रींचा अनुपम खेर यांच्याबद्दल मोठा दावा
या ट्विटला समांथानं चोख उत्तर दिलं. समांथानं म्हटलंय, मी प्रार्थना करते की तुम्हाला कधीच माझ्यासारखं महिनोमहिने उपचार आणि औषघोपचार घ्यावे लागू नयेत. तुमच्या चेहऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी माझ्याकडून खूप प्रेम.
समांथानंतर त्या पोस्टवर समांथाच्या आणखी एका चाहत्यानं त्या पोस्टवर लिहिलंय; ज्या व्यक्तीला ऑटोइम्यून आजार झाला आहे आणि त्याला स्टिरॉइड्यसह अनेक उपचार सुरू आहेत. आजाराचे सगळे परिणाम त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. अशा वेळी त्या व्यक्तीवर अशा पद्धतीनं टिप्पणी करणं किती क्रूर आहे. आजाराशी सामना करणाऱ्या ती व्यक्ती किती शांत आणि उल्लेखनीय ताकदीनं समोर येत आहे याबद्दल कोणी काही बोलत नाही याचं मला फार वाईट वाटतंय.