समंथा रुथ प्रभू
मुंबई, 13 एप्रिल : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. यासोबतच ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्येही व्यस्त आहे. अलीकडेच तिला एका गंभीर आजाराने ग्रासले होते. तिची तब्येत चांगलीच खालावली होती. पण ती यातून लवकर सावरली आणि पुन्हा कामावर परतली. सध्या समंथा ‘शाकुंतलम’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. समंथाचा हा चित्रपट उद्या म्हणजेच १४ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच अभिनेत्रीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आता पुन्हा एकदा समंथाची प्रकृती खालावली आहे, याची माहिती समंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. ‘शाकुंतलम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त वेळापत्रक असताना समंथा आजारी पडली आहे. खुद्द समांथाने तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.
समंथा रुथ प्रभू यांनी गुरुवारी दुपारी तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, प्रचंड तापासोबतच तिचा आवाजही गेला आहे. समांथाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी या आठवड्यात माझ्या चित्रपटाच्या आणि तुमच्या प्रेमाच्या प्रमोशनसाठी खूप उत्सुक आहे.’ यासोबत तिने पुढे लिहिले की, ‘दुर्दैवाने वेळापत्रक खूपच व्यस्त आणि प्रमोशन जोरात चालू आहे. पण त्या दरम्यान, मला ताप आला आहे आणि माझा आवाजही गेला आहे.’ या ट्विटनंतर समंथाचे चाहते तिच्या तब्येतीबद्दल खूप चिंतित झाले आहेत. बॉलिवूडची ‘ही’ टॉपची अभिनेत्री बंद खोलीत स्वत:ला करून घ्यायची शिक्षा; यामुळे तुटलं घर, करिअर उद्ध्वस्त झालं समांथाने चाहत्यांना तिच्या तब्येतीची माहिती देताच तिच्या ट्विटवर कमेंट्सचा महापूर आला. पुन्हा एकदा सामंथाचे चाहते चिंतेत आहेत आणि सतत तिच्या तब्येतीचे अपडेट्स विचारत आहेत. समांथाची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, ‘लवकर बरे व्हा मॅडम. आमच्या प्रार्थना आणि प्रेम तुमच्या पाठीशी आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला सदैव तयार आहोत. तुझ्यावर प्रेम आहे. एकाने लिहिले, ‘तुझा चित्रपट हिट होईल, फक्त तुझ्या फिटनेसची काळजी घे.’
दुसरीकडे, समंथाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, ‘शाकुंतलम’ हा कालिदासाच्या प्रसिद्ध नाटक शाकुंतलावर आधारित आहे. ती एक पौराणिक कथा आहे. ‘शाकुंतलम’ 14 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. समंथा सतत चित्रपटाचे प्रमोशन करत असते. दुसरीकडे, ती विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. सततच्या कामाचा परिणाम अभिनेत्रीच्या तब्येतीवर झाला आणि आता ती आजारी पडली आहे.