JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'किसी का भाई किसी की जान'; नव्या रूपात भेटीला आला सलमान खान, टीझरनं जिंकलं मन

'किसी का भाई किसी की जान'; नव्या रूपात भेटीला आला सलमान खान, टीझरनं जिंकलं मन

सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो.

जाहिरात

salman khan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर: सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे झाल्याच्या खास प्रसंगी सलमाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव घोषित केलं होतं. आता आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या 59 सेकंदांच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटांचा टीझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये सलमान खानची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सलमानचा असा अवतार तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. व्हिडीओमध्ये सलमानची एण्ट्री नेहमीप्रमाणे स्वॅगमध्ये पहायला मिळतेय. हा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

सलमानच्या या चित्रपटातील स्टार कास्टविषयी खूप चर्चा रंगल्या होत्या. अखेर चित्रपटाच्या स्टारकास्टचा खुलासा झाला असून सलमाननं व्हिडीओ शेअर करत स्टार कास्टलाही टॅग केलं आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील शंका, प्रश्न, दूर झाले आहेत. सलमानने टॅग केलेल्या कलाकारांमध्ये दक्षिण अभिनेता व्यंकटेश, पूजा हेगडे, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी यांचा समावेश आहे. हेही वाचा -  Kartik Aryan च्या हाती लागला आणखी एक चित्रपट, पडद्यावर करणार ‘आशिकी’ दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमानसोबत तगडी स्टार कास्ट असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. टीझरवरुन सलमानच्या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या