JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : प्रभूदेवा-सलमानचा डान्स क्लास, भाईजानचा 'हा' अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल

VIDEO : प्रभूदेवा-सलमानचा डान्स क्लास, भाईजानचा 'हा' अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल

‘भारत’च्या तगड्या यशानंतर अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ ची तयारी करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : ‘भारत’च्या तगड्या यशानंतर अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ ची तयारी करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार आणि दिग्दर्शक प्रभूदेवा करत आहे. या सिनेमासाठी सलमान सुद्धा खूप मेहनत घेत आहे. मागच्या काही दिवसांपासून तो त्याचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत आहे. पण आता मात्र सलमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सर्वांना सलमानचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. सलमाननं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात प्रभूदेवा आणि सलमान खान दिसत असून प्रभूदेवा सलमानचा डान्स क्लास घेताना दिसत आहे. यात सलमान सोबत साउथ सुपरस्टार सुदीप आणि प्रोड्यूसर साजिद नाडियडवाला हे सुद्धा दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रभूदेवा डान्स शिकवताना आणि साजिद, सलमान आणि सुदीप त्याच्या मागोमाग डान्स करताना दिसत आहे. फेमस गाणं ‘उर्वशी’वर हे सर्वजण डान्स करत आहेत. पण यातील डान्स मूव्ह पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओला सलमाननं ‘मास्टर प्रभूदेवा डान्स क्लास घेताना’ असं कॅप्शन दिलं आहे. भारत- न्युझीलंड सामन्यादरम्यान हा खेळाडू फिरतोय क्रोएशिया आणि इटलीत

‘दबंग 3’मध्ये सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रज्जो आणि अरबाज खान मक्खनचंदच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर सलमानच्या वडीलांची म्हणजेच प्रजापति पांडे यांची भूमिका विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना साकारणार आहेत. ‘मुस्लीम ज्वालामुखी होऊन फुटतील तेव्हा सर्व कलमा वाचायला लागतील,’ एजाज खान

सलमान खाननं काही दिवसांपूर्वी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, दिग्दर्शक प्रभूदेवा दिसले होते. यासोबत या व्हिडिओमध्ये विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना सुद्धा दिसले होते. यात सलमान आणि प्रभूदेवा यांनी प्रमोद खन्ना यांची ओळख करून दिली होती. पत्रकाराशी पंगा घेणं कंगनाला पडणार भारी, मीडियानं घेतला ‘हा’ निर्णय =================================================================== VIDEO: ‘कहो ना प्यार है’ फेम अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या