JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानच्या नावानं फसवणुकीचा प्रयत्न, दबंगनं केलं चाहत्यांना सावध

सलमानच्या नावानं फसवणुकीचा प्रयत्न, दबंगनं केलं चाहत्यांना सावध

बॉलिवूड कलाकारांच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. त्यामुळे या सेलिब्रिटींना नेहमीच अशा गोष्टींबाबत सतर्क राहावं लागतं.

जाहिरात

मात्र त्याच्या स्टाइलमध्ये एक गोष्ट नेहमी हायलाइट होते ती अनेकदा सलमानचे कपडे काळ्या रंगाचे असतात. पण हा रंग निवडण्याच्या मागेसुद्धा एक कारण असल्याचा खुलासा नुकताच एका डिझायनरनं केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मे : बॉलिवूड कलाकारांच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. त्यामुळे या सेलिब्रिटींना नेहमीच अशा गोष्टींबाबत सतर्क राहावं लागतं. नुकताच सलमान खानबाबत असाच एक फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. सलमान खाननं त्याच्या अधिकृत ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे ज्या फोटोमध्ये सलमानचा बीइंग ह्यूमन हा ब्रँड एक इव्हेंट आयोजित करत असून यात सलमान होस्ट असल्याचं म्हटलं आहे. सलमाननं हे पोस्टर आपल्या ट्विटरवर शेअर करताना, ‘मी किंवा बीइंग ह्यूमन यांनी अशा कोणत्याही इव्हेंटचं आयोजन केलेलं नाही.’ असं कॅप्शन देत आपल्या चाहत्यांना सावध केलं आहे. पोस्टरवरील माहितीनुसार फर्जीवाडा, उत्तरप्रदेशच्या बिजनौर या ठिकाणी सलमान खान या शोला होस्ट करणार असल्याचं सांगत लोकांकडून पैसे घेतले जात आहेत आणि लोकांकडून पैसे उकळवण्यासाठी या जाहीरातीचा वापर केला जात आहे. पण सलमान खानला ही गोष्ट समजल्यावर त्यानं जबाबदारीनं आपल्या चाहत्यांना तो असं कोणत्याही इव्हेंटला हजेरी लावणार नसल्याचं सांगत सर्वांना अशा प्रकारच्या फसवणूकीपासून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’ सलमान खानचा बहुचर्चित ‘भारत’ हा सिनेमा येत्या 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हा सिनेमा साउथ कोरियन सिनेमा ‘ओड टु माय फादर’चा हिंदी रिमेक आहे. यात सलमान सामान्य नागरिक ते नेव्ही ऑफिसर अशा एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या वयातील भूमिका साकारताना दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहे. विराट कोहलीनं केली कमाल, दिग्गजांना मागे टाकत मिळवला हा पुरस्कार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या