मुंबई, 20 मे : लॉकडाऊनच्या काळात सर्वजण सध्या आपापल्या घरी आहे. आताच्या या परिस्थितीत आपल्या नातेवाईकांनाही भेटणं कोणालाच शक्य नाही. कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता केंद्र सरकारनं हे लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवलं आहे. पण काहीजण असे आहेत जे त्यांच्या कुटुंबापासूनच दूर आहेत. यापैकीच एक आहे अभिनेता सलमान. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर थांबला आहे. तर त्याचे आई-वडील मुंबईमध्ये आहेत. जवळपास 60 दिवसांनंतर सलमान त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी मुंबईला पोहोचला. सलमान मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या आई-वडिलांना खूप मिस करत होता. स्पॉटबॉय-ईने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान मंगळवार 19 मे ला आपल्या आईवडिलांना भेटायला मुंबईमधील त्याचा गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचला होता. काही वेळ आपल्या आई-वडिलांसोबत स्पेंड केल्यानंतर सलमान पुन्हा त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर परतला आहे. अर्थात या सगळ्यासाठी त्यानं परवानगी घेतली होती आणि या दरम्यान त्यानं सोशल डिस्टंसिंगचं पालन सुद्धा केलं. नवाझुद्दीनवर पत्नीनं लावले गंभीर आरोप, मुलांच्या कस्टडीची केली मागणी
सलमान खाननं आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत अनेकदा काळजी व्यक्त केली होती. सध्या सलमान त्याच्या पनवेल फार्म हाउसवर आहे. या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता खान, तिचा पती आयुष शर्मा आणि मुलं सुद्धा आहे. याशिवाय युलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस, भाचा निर्वाण असे आणखी काही लोक सलमानसोबत त्याच्या फार्महाऊसवर थांबले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांचं ‘तेरे बिना’ हे अल्बम साँग रिलीज झालं. या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद सुद्धा मिळाला. हे गाणं सलमाननं स्वतः गायलं असून अगदी कमी गोष्टींचा वापर करून सलमानच्याच पनवेल फार्म हाऊस परिसरात या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. या गाण्यातील सलमान-जॅकलिनच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांची मनं जिंकली. कोरोना वॉरियर्स पोलिसांना निवेदिता आणि अशोक सराफ देणार गोड भेट! भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराट