JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / जबरा फॅन! सलमानला भेटण्यासाठी त्यानं सायकलवरुन केला 600 किलोमीटरचा प्रवास

जबरा फॅन! सलमानला भेटण्यासाठी त्यानं सायकलवरुन केला 600 किलोमीटरचा प्रवास

सलमानच्या या 52 वर्षीय चाहत्यानं सायकलवरून चक्क 600 किलोमीटरचा प्रवास केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुहावटी, 14 फेब्रुवारी : प्रत्येक कलाकाराचे अनेक फॅन्स असतात. काही कलांकारावर फक्त प्रेम करणारे तर काही वेड्यासारखं प्रेम करणारे. कधीकधी फॅन्सचा हा वेडेपणा त्यांनी काहीही करायला भाग पाडतो. आपल्या आवडत्या अभित्रेनी किंवा अभिनेत्याला भेटण्यासाठी किंवा त्याला खूश करण्यासाठी चाहते हवं ते करायला तयार असतात. पण हेच फॅन्स कलाकाराला घडवण्यासाठी मदतही करतात. कधीकधी हेच फॅन्स डोकेदुखीही ठरत असतात. असाच एक दिवाना फॅन बॉलिवूडच्या दबंग भाईजानला भेटण्यासाठी आला होता. भूपेन लिक्सन असं या चाहत्याचं नाव आहे. 52 वर्षीय भूपेन यांनी चक्क सायकलने 600 किलोमीटरचा प्रवास करत सलमानला भेटण्यासाठी आला. VIDEO : सैफ अली खाननं शेअर केलं बेडरुम सीक्रेट, लाजेनं गोरीमोरी झाली करिना कपूर एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल वृत्त दिलं आहे. भूपेन लिक्सन हे आसमच्या तिनसुखीयामधील सायकल स्वार असून ते 600 किलोमीटर सायकल चालवत गुवाहाटीमध्ये पोहोचले. भूपेन यांनी 8 फेब्रुवारीपासून तिनसुखीयमधून सायकल चालवायला सुरुवात केली होती. सलमान खान फिल्मफेअर अॅवॉर्डसाठी गुवाहटीमध्ये जाणार होता. आणि त्यासाठीच भूपेन हे गुवाहाटीला सायकल चालवत पोहोचले.

एएनआय या वृत्तसंस्थेने भूपेन यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भूपेन हातात एक प्रींटआऊट घेऊन उभे आहेत. त्या प्रींटआऊटवर लिहिलेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय भूपेन यांच्या नावाची इंडिया बुर ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. त्यांनी एका तासात 48 किलोमीटर सायकल चालवली होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी या संपुर्ण प्रवास त्यांनी सायकलच्या हँडलला हात न लावता पूर्ण केला होता. प्रेमात आकंठ बुडालेली ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झाली होती कुमारी माता!

भूपेन यांनी 600 किलोमीटरचा प्रवास केला खरा मात्र त्यांना सलमान खानला भेटता आलं नाही. याआधी अक्षय कुमारचाही फॅनही अक्षयला भेटण्यासाठी 18 दिवसात 900 किलोमीटर प्रवास करत आला होता. आणि या फॅनला अक्षयला भेटण्याची संधीही मिळाली होती. सिद्धार्थ शुक्लानं घेतला अर्जुन कपूरशी पंगा, सोशल मीडियावर भांडणाचा VIDEO VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या