JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खानच बॉलिवूडचा ‘बाहुबली’, ‘या’ बाबतीत अक्षय-आमिरलाही टाकलं मागे

सलमान खानच बॉलिवूडचा ‘बाहुबली’, ‘या’ बाबतीत अक्षय-आमिरलाही टाकलं मागे

सलमान खाननं आता असं काही केलं आहे की बॉलिवूडमध्ये आमिर खान अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांवर वरचढ ठरला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 मार्च : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. नुकतीच त्यानं चाहत्यांना कोरोना व्हायरसच्या बाबतीत काळजी घ्या अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे तो खूप चर्चेत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सलमान खान बॉलिवूडमध्ये आमिर खान अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकत कमाईच्या बाबतीत सर्वात वरचढ ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आता एका महागड्या ब्रँडसाठी सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड अँडोर्स ठरला आहे. या ब्रँडच्या शूटसाठी सलमाननं प्रति दिन 7 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. सलमाननं नुकतंच एका चायनिज स्मार्टफोन ब्रँडच्या जाहिरातीचं शूट केलं. हे शूटिंग 4 ते 5 दिवस सुरू होतं. याच जाहिरातीसाठी सलमानला प्रत्येक दिवसासाठी 7 कोटींची रक्कम देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक

मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार सलमाननं फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या महबूब स्टुडिओमध्ये कमर्शियलसाठी शूटिंग केलं. यासाठी त्यानं घेतलेलं हे मानधन पाहता एका जाहिरातीसाठी एवढी मोठी रक्कम घेणारा सलमान हा पहिलाच अभिनेता आहे. त्यामुळे आमिर-अक्षयला मागे टाकत त्यानं बॉलिवूडचा बाहुबली आपणच असल्याचं दाखवून दिलं आहे. सारानं शेअर केले इब्राहिमसोबतचे BIKINI फोटो; नेटकरी म्हणाले, ‘थोडी तरी लाज…' याशिवाय सलमाननं बिग बॉसच्या विकेंड एपिसोडसाठी 31 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. हा शो होस्ट करण्याची सलमानची ही 10 वी वेळ होती. सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या सीझनसाठी सलमानला तब्बल 403 कोटींचं मानधन देण्यात आलं होतं.

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर आगामी सिनेमा ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’चं शूटिंग थायलंडमध्ये होणार होतं. मात्र पण कोरोना व्हायरमुळे हे लोकेशन बदलण्यात आलं आहे. सलमान खान आणि त्याच्या टीमला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही त्यामुळे थायलंडमध्ये शूट होणारे हे सर्व सिक्वेन्स सीन्स आता मुंबईमध्येच शूट केले जाणार आहेत. मात्र थायलंडचे लोकेशन बदलण्यात आल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सलमानच्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. या सिनेमात सलमान सोबतच दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि गौतम गुलाटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 22 मे ला रिलीज होणार आहे. मुलीच्या घटस्फोटानंतर बॉलिवूड अभिनेत्री म्हणते, ‘लग्नापेक्षा लिव्ह-इनमध्ये राहा'

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या