JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...आणि सैफ अली खान चक्क स्वतःच्याच घरचा पत्ता विसरला!

...आणि सैफ अली खान चक्क स्वतःच्याच घरचा पत्ता विसरला!

करीनाच्या वाढदिवसासाठी सैफ आपल्या कुटुंबासह आपल्या पटौदी पॅलेसला रवाना झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : छोटा नवाब म्हणजेच अभिनेता सैफ अली खान सध्या बॉलिवूड सिनेमांपासून काहीसा दूर आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली त्याची वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’ खूप गाजली. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये कधी परतणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं असतानाच सैफ एका विचित्र कारणानं चर्चेत आला आहे. सैफसोबत घडलेली ही विचित्र गोष्ट वाचून तुम्हीलाही हसू आवरणार नाही. नवभारत टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सैफ अली खान चक्क त्याच्याच घराचा पत्ता विसरला. करीनाच्या वाढदिवसासाठी सैफ आपल्या कुटुंबासह आपल्या पटौदी पॅलेसला रवाना झाला. मात्र तिथे जात असताना चक्क तो पॅलेसला जाणारा रस्ता विसरला. हरियाणाच्या प्रसिद्ध पटौदी कुटुंबाचा हा राजवाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. येत्या 21 सप्टेंबरला करीना याच ठिकणी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. शादी के साइड इफेक्ट! दीपवीरचा IIFA लुक पाहून तुम्हीही लावाल कपाळाला हात

यासाठीच सैफ पत्नी करीना आणि मुलगा तैमुर सोबत पटौदी पॅलेसला पोहोचला. मात्र तिथे जाणारा रस्ता काही केल्या त्याच्या लक्षात येईना शेवटी त्यानं तिथल्या स्थानिक लोकांना विचारून आपल्या घरचा पत्ता शोधला. सध्या या भागात अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग अनेक ठिकणी बदलण्यात आले आहेत. तर अनेक रस्ते नव्यानं तयार झाले आहेत. त्यामुळे सैफचा गोंधळ उडाला आणि त्याची कार चुकीच्या रस्त्याला पोहोचली. हे लक्षात आल्यावर शेवटी त्यानं तिथल्या स्थानिक लोकांना पटौदी पॅलेसचा रस्ता विचारला. VIDEO : रानू मंडलनंतर आता या मुलीचा आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क काही दिवसांपूर्वीच सैफची बहुचर्चित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज झाली. पहिल्या भागाप्रमाणे या भागालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेब सीरिजमध्ये सैफनं सरताज सिंग या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याशिवाय सैफ लवकरच ‘भूत पुलिस’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत फातिमा सना शेख आणि अली फजल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘हा तर रणबीरच्या संगतीचा परिणाम’ बॉडीगार्डशी उद्धट वागल्यानं आलिया झाली ट्रोल ====================================================== VIDEO : ‘सगळे सण एकत्र आले’, खिचडीवाल्या ‘करोडपती’ बबिता ताडेंशी खास बातचीत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या