JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पाहुण्यांना घरी बोलवायचं आणि तासंतास उपाशी ठेवायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आरोपावर सईनं दिलं स्पष्टीकरण

पाहुण्यांना घरी बोलवायचं आणि तासंतास उपाशी ठेवायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आरोपावर सईनं दिलं स्पष्टीकरण

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात सईची चांगलीच पोलखोल होताना दिसणार आहे.

जाहिरात

सई ताम्हणकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : मराठी तसेच बॉलिवूडमध्ये आपली नवी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर. आपल्या अभिनयानं सईनं प्रेक्षकांची मनं जिंकलीच. पण तिच्या स्टाइलमुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात हास्यरसिक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सईचा अभिनय जितका बोलका आहे तितकीच खऱ्या आयुष्यातही बोलकी आणि मनमिळावू आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकरांशी तिचं जिव्हाळ्याचं नातं आहे. अनेकांच्या घरी सईची उठबैस असते. अनेकांना ती तिच्या घरी बोलावते. पण घरी आलेल्या पाहुण्यांना सई उपाशी ठेवते, असा आरोप तिच्या एका मैत्रिणीनं केला आहे. सई पाहुण्यांना घरी जेवायला बोलावते आणि त्यांना तासंतास उपाशी ठेवते असा आरोप एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं सईवर केला आहे. सईचा हा स्वभाव अखेर तिच्या चाहत्यांसमोर आला आहे. सई झी मराठीवरील गायक अपधुत गुप्तेच्या खुप्ते तिथे गुप्ते या शोमध्ये सहभागी झाली होती. तिथे अवधुतने तिला अनेक प्रश्न विचारले. त्याच तिच्या खास मैत्रीणीने तिच्यावर केलेला आरोप केलेला सांगितला. या आरोपाचं उत्तर देखील सईनं दिलंय. हेही वाचा -  Happy Birthday Sakhi : सखी-सुव्रतच्या लव्हस्टोरीमध्ये फेसबुकचा आहे मोठा रोल, अशी झाली पहिली भेट

अवधुतचे सईला प्रश्न विचारला की, “सई पाहुण्यांना घरी जेवायला बोलावते आणि मुद्दाम त्यांना तासंतास उपाशी ठेवते हे खरं आहे?” यावर सईनं मजेशींर अंदाजात हा आरोप कोणी केला आहे हे ओळखते. सईवर असा आरोप करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे. सईनं सोनालीबरोबर खरंच असं केलं का याचं उत्तर सईनं दिलं.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला घरी बोलावून उपाशी ठेवण्याच्या आरोपावर सई म्हणाली, “मी सोनालीला तिचं लग्न झाल्यानंतर तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलावलं होतं. तू ये मग मी तुला छान काही तरी शिवजून घाऊ घालेन असं मी तिला म्हणाले. ती नवऱ्याबरोबर घरी आली. ती आली आणि घरी मस्त टाइमपास झोन होता. आम्ही मॅच बघत होतो आणि या सगळ्यात मी तिच्यासाठी लंच बनवणार होते पण त्याचा डिनर झाला एवढंच”. सईच्या या उत्तरावर स्वत: सई आणि खुपते तिथे गुप्तेच्या सेटवरच्या सगळ्यांना हसू कोसळलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या