प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई, 11 जून: टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची विजेती रुबिना दिलैक बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या कार अपघाताचे कारण सांगताना त्याने रुबिनाच्या प्रकृतीचीही माहिती दिली आहे. अभिनवने रुबीना सध्या ठीक असल्याची माहिती दिली आहे. रुबिना विषयी ही माहिती ऐकून चाहते चिंतेत पडले आहेत. अभिनव शुक्लाने त्याच्या ट्विटर हँडलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने अपघातग्रस्त कारचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत लिहिले आहे, ‘आमच्यासोबतही घडले, तुमच्यासोबतही घडू शकते. फोनवर बोलत असताना ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. याबाबत अधिक माहिती नंतर शेअर केली जाईल. रुबिना गाडीच्या आत होती, पण सध्या ती ठीक आहे. ती सध्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर आहे.’ तसेच त्याने मुंबई पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी असेही लिहिले की, ‘ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलिस स्टेशनला घटनेची माहिती द्या.’
ही पोस्ट पाहिल्यानंतर रुबिना दिलैकचे चाहते काळजीत पडले आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. तसंच रुबिनाला काळजी घेण्यास सांगत आहेत. सुपरस्टार होती करीना-करिश्माची आई; नवऱ्यासाठी करिअर सोडलं अन् त्यानेच दिला असा धोका रुबिना दिलैक ही टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने छोटी बहु या मालिकेद्वारे अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. तिची ही मालिका हिट ठरली होती. याशिवाय तिने बिग बॉसच्या १४ वा सिझन जिंकला होता. तसेच ‘खतरों के खिलाड़ी 12’, ‘झलक दिख लाजा’ मध्ये देखील ती सहभागी झाली होती.
याआधी कालच ‘इश्क का रंग सफेद’ अभिनेत्री स्नेहल रायची कार ट्रकला धडकल्याची बातमी आली होती. स्नेहलचाही अपघात झाला होता. स्नेहलने शेअर केले, ‘काय होत आहे ते मला समजत नव्हते. अचानक कोठूनही एका ट्रकने माझ्या कारला धडक दिली. माझ्या ड्रायव्हरचे आभार, त्याने माझे प्राण वाचवले. आम्ही पोलिस स्टेशनला फोन केला आणि 5 ते 10 मिनिटांत पोलिस पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनचे योगेश भोसले सर यांचे मी आभारी आहे. त्याला खूप मदत झाली. काय झाले याचा विचार करून मी घाबरलो आणि त्यांनी ग्लुकोज दिले आणि त्या वेळी जे आवश्यक होते ते केले. स्नेहलही आता सुखरूप आहे.