JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : प्रसूतीअगोदर राम चरणच्या बायकोची अशी झाली होती अवस्था, उपासानाचा रूग्णालयातील व्हिडिओ व्हायरल

VIDEO : प्रसूतीअगोदर राम चरणच्या बायकोची अशी झाली होती अवस्था, उपासानाचा रूग्णालयातील व्हिडिओ व्हायरल

आरआरआर फेम अभिनेता राम चरणच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालंय.दरम्यान प्रसृतीच्या अगोदर उपसनाचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये उपासना काहीशी भावुक झाल्याची दिसत आहे.

जाहिरात

प्रसृतीअगोदर राम चरणच्या बायकोची अशी झाली होती अवस्था

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून-आरआरआर फेम अभिनेता राम चरणच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालंय. राम चरण आणि पत्नी उपासना आई बाबा झाले. 20 जून रोजी उपासनने मुलीला जन्म दिला. दोघांच्या घरी लक्ष्मी आल्यानं दोघेही खुश आहे. लग्नाच्या 11 वर्षांनी राम चरण आणि उपासना आई-वडील झालेत. तर दुसरीकडे अभिनेते चिरंजीवी देखील आजोबा झाल्याच्या आनंदात आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड तसेच चाहत्यांकडून राम चरण आणि उपासना यांच्या शुभेच्छांचा आणि चिमुकलीवर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव होतोय. दरम्यान प्रसृतीच्या अगोदर उपसनाचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये उपासना काहीशी भावुक झाल्याची दिसत आहे. उपायनाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टर उपासनाला व्हिलचेअरवरुन डिलिव्हरी रूममध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. यादरम्यान उपासना आनंदी दिसत आहे. सुरूवातीला ती हासताना दिसतेय मात्र नंतर ती काहीशी भावुक झाल्याचे तिच्या पाणीदार डोळ्याहून स्पष्ट होते. उपासनाच्या पुढे रामचरण चालत जाताना दिसत आहे. उपासनाची मैत्रीण मेहा पटेलने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिड्ओ पोस्ट केला आहे. या स्टोरीवर लिहण्यात आलं आहे “ पाच दिवसांपूर्वी. आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. खूप प्रेमाने वेढलेला. वाचा- ‘जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे…’, नांदेडच्या तरुणानं थेट अजय देवगण… उपासनाची डिलिव्हरी हैद्राबाद येथील अपोलो हिल्स रुग्णालयात झाली. अपोलो रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलंय, “उपासना कामिनेनी कोनिडेला आणि राम चरण कोनिडेला 20 जून 2023 रोजी हैद्राबादच्या अपोलो हिल्स रुग्णालयात मुलगी झाली. डिलिव्हरीनंतर उपासना आणि बाळ या दोघांची प्रकृती उत्तम आहे.

आई झाल्यानंतर चार दिवसांनी उपासनाने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रामचरणच्या मांडीवर त्यांच्या घरातील श्वान बसलेला दिसत आहे. तर उपासनाच्या मांडीवर त्यांची मुलगी आहे. दोघांच्या पाठीमागे गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे आणि फुले लावली आहेत. त्यावर ‘वेलकम होम बेबी’ असे लिहिले होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये उपासनाने लिहिले की, आमच्या चिमुरडीचे केलेले स्वागत पाहून भारावून गेलो. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार.

संबंधित बातम्या

राम चरणने काही दिवसांआधीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित उपासना प्रेग्नंट असून आम्ही आई बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय होणाऱ्या बाळाची वाट पाहत होते. उपासना आणि राम चरण यांच्या लग्नाची 11वर्ष त्यांनी नुकतीच साजरी केली. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांनी जल्लोषात साजरा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या