मुंबई, 28 डिसेंबर : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला. 37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं आहे. पण कुशलचे नातेवाईक मात्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. तसेच त्याचे मित्रांना सुद्धा त्याच्या अशा जाण्यानं मोठा धक्का बसला आहे. अशातच कुशलच्या आत्महत्येनंतर त्याचा मित्र अभिनेता रोहित रॉयनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित माफी मागितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून रोहित रॉयनं मागितली माफी कुशलच्या आत्महत्येनंतर अभिनेता रोहित रॉयनं कुशलच्या कठिण काळात त्याच्यासोबत नसल्याची खंत व्यक्त करत सोशल मीडियावरून त्याची माफी मागितली आहे. त्यानं लिहिलं, कोणाला कल्पनाही नव्हती की या हसऱ्या चेहऱ्यामागे एक त्रासलेलं मन सुद्धा आहे. जेव्हा तुला आमची सर्वाधिक गरज होती त्यावेळी मी तुझ्यासोबत नव्हतो. मला माफ कर कुशल. रेस्ट इन पीस माय ब्रदर. मी अद्याप या धक्क्यातून सावरलेलो नाही जे तू अनुभवलंस आणि ज्यामुळे तू हे टोकाचं पाऊल उचललंस ते तुझं दुःख मी समजू शकत नाही. तणावमुक्त राहायचंय? मग फॉलो करा इम्रान हाश्मीचा सोपा डाएट प्लान
रोहितनं त्याच्या या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘मानसिक आजाराबद्दल लाज बाळगू नका. तसेच कोणापासून लपवू सुद्धा नका. आपल्या जवळच्या लोकांशी याबद्दल बोला. मला विश्वास आहे की यातून बाहेर येण्यासाठी ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. अनेकदा अशावेळी आपल्याला वाटतं की ज्याच्याशी आपल्याला बोलावसं वाटतं ती व्यक्ती बीझी आहे. पण तरीही त्याच्याशी बोला. ती व्यक्ती तुम्हाला नक्कीच वेळ देईल. माणूसकी अद्याप शिल्लक आहे.’ आत्महत्या करण्यापूर्वी मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं लिहिली पोस्ट कुशल पंजाबीनं गुरुवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या मृत्यूनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं आहे. जॉननं लिहिलं, ‘तुझ्या मृत्यूच्या वृत्तानं मला धक्का बसला आहे. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो’
कुशलच्या मृत्यूनंतर एकीकडे DCP नं सांगितलं की त्यानं त्याच्या सुसाइड नोटमध्ये कोणालाही माझ्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवू नका असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काही सूत्रांच्या माहितीनुसार कुशल अर्थिक तंगीशी सामना करत होता. त्याच्याकडे काम नव्हतं. तसेच प्रोफेशनल लाइफमधील समस्यांचा परिणाम त्याच्या पर्सनल लाइफवर होत होता. हीच गोष्ट त्याच्या मृत्यूचं कारण ठरली.
कुशलनंच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यानं Audrey Dolhen हिच्याशी 2015 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘जिंदगी विन्स’ या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं. कुशल पंजाबीच्या आत्महत्येबद्दल मित्राचा धक्कादायक खुलासा