मुंबई, 30 एप्रिल : मागच्या काही काळापासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर लवकरच भारतात परततील अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी मुलगा रणबीर कपूरनं सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर आता ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाले असून ते लवकरच भारतात परततील असा खुलासा केला. ऋषी कपूर यांना नेमका कोणता आजार झाला आहे. याविषयी पहिल्यांदाच रणधीर यांनी खुलासा केला. वाचा : राणी मुखर्जी पुन्हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, ‘मर्दानी 2’चा फर्स्ट लुक रिलीज रणधीर कपूर म्हणाले, ऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचा कालावधी संपत आला असून, ते जवळपास कॅन्सरमुक्त झाले आहेत. मात्र त्यांना भारतात परतण्यासाठी अजून काही वेळ जाईल. ते आपले सर्व उपचार संपवून मगच भारतात परततील. कदाचित पुढच्या महिन्यात ते मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. यावेळी पहिल्यांदाच रणधीर कपूर ऋषी यांच्या आजारपणाविषयी थेट बोलले. आत्तापर्यंत त्यांच्या आजारावर थेट बोलणं सर्वांनीच टाळलं होतं त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे याविषयी कुटुंबीयांनी गुप्तता राखली होती. वाचा : ‘तुला पाहते रे’मध्ये ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऋषी कपूर यांच्या पत्नी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्ट मधून ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असल्याची हिंट दिली होती. त्यांनी लिहिलं, ‘या नवीन वर्षाच्या सुरुवातीला कमी प्रदूषण आणि ट्राफिक करण्याचा प्रयत्न करुया. जेणेकरून भविष्यात कॅन्सरची शक्यता कमी होईल’ यासोबतच त्यांनी एक फॅमिली फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
वाचा : विकी कौशलशी ब्रेकअपनंतर हरलीन सेठीनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया याशिवाय निर्माता राहुल रावैल यांनीही त्यांच्या फेसबुकवर ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाल्याची पोस्ट केली. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर करत ‘ऋषी कपूर (चिंटू) कॅन्सर फ्री’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलं.
ऋषी कपूर सप्टेंबर 2018 पासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. यामुळे ते त्यांच्या आई कृष्णा कपूर यांच्या अंतिम संस्कारांसाठीही उपस्थित राहू शकले नव्हते. आपल्या आजाराविषयी त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली होती.