urvashi rautela-rishabh-pant
मुंबई,08 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचं आणि मिस्टर आरपीचं नातं. हा आरपी म्हणजे ऋषभ पंत. उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचा वाद फारच जुना आहे. हे दोघेही सतत एकमेकांना टोमणे देत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एकदा सांगितलं होतं की, ती क्रिकेटरला डेट करत आहे. ऋषभने ही गोष्ट फेटाळून लावली होती. त्यांनतर लगेचच त्याने अभिनेत्रीला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. ऋषभ आणि उर्वशी मुंबईत एकेठिकाणी एकत्र दिसून आले होते त्यांनतर त्यांच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर उर्वशी अनेकदा स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना पाहायला जायची. तेव्हापासून या दोघांचं नेमकं काय सुरुये काही कळायला मार्ग नाही. आता पुन्हा हे दोघे चर्चेत आले आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, कदाचित आधीच्या सामन्याचा आहे. ज्यामध्ये चाहते 24 वर्षांच्या ऋषभ पंतची छेड काढताना दिसले. भर स्टेडियममध्ये ऋषभ उर्वशी रौतेलाचे नाव घेत चिडवू लागले. व्हायरल क्लिपमध्ये, पंत सीमेच्या दोरीजवळून चालताना दिसत आहेत तेव्हा जवळपास बसलेल्या काही प्रेक्षक ‘भाई उर्वशी बुला रही है’ असे म्हणताना ऐकू येतात. पण यावेळी मात्र ऋषभला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्याने या टवाळ प्रेक्षकांना सडेतोड उत्तर दिलं. हेही वाचा - Urvashi Rautela: ऋषभ पंत नव्हे तर ‘हा’ आहे उर्वशीच्या आयुष्यातील खरा ‘मिस्टर आरपी’
ऋषभचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 2018 मध्ये पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. दोघेही अनेकदा लंच-डेटवर दिसले. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मात्र, काही वेळानंतर पंतने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची बातमी सोशल मीडियावर आली. मात्र, दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांना ब्लॉक केल्याचे नंतर समोर आले.अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री ऑस्ट्रेलियाला रवाना झाली होती, परंतु भारतीय क्रिकेटरचा ‘पिछा’ केल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले होते.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत या दोघांतील वाद फारच जुना आहे. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीने आरपी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. एवढेच नाही तर ‘मिस्टर आरपी (आरपी)‘सोबतचे नाते तुटल्याची संपूर्ण कहाणीही त्यांनी सांगितली.
मात्र, त्यांनी आरपीचे पूर्ण नाव सांगितले नाही. त्यामुळेच या मुलाखतीची क्लिप पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी उर्वशी रौतेला ऋषभ पंतचा उल्लेख करत असल्याचा अंदाज लावला. त्यानंतर, अभिनेत्रीच्या सर्व पोस्ट पंत यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या.