JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Richa Chadha: सैनिकांविषयी ट्विट करणं रिचा चड्ढाला भोवणार; अभिनेत्री विरोधात होणार FIR ?

Richa Chadha: सैनिकांविषयी ट्विट करणं रिचा चड्ढाला भोवणार; अभिनेत्री विरोधात होणार FIR ?

रिचा चड्ढाने गलवानबद्दल ट्विट केले होते, त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिने केलेलं ट्विट हे भारतीय लष्कराचा अपमान मानला जात आहे. आता वाढत्या वादानंतर ऋचाने माफी मागितली आहे. पण तिच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात

रिचा चड्ढा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूडचे कलाकार आणि विवाद यांचं जुनं  नातं आहे. अनेकवेळा हे कलाकार अशी काही वक्तव्य करतात ज्यामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जातात. असाच काहीसा प्रकार रिचा चढ्ढा सोबत आता घडला आहे. नुकतंच रिचाने भारतीय लष्कराबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमुळे तिला ट्रोल  केलं जात आहे. रिचाने नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या बोलण्यावर आपले म्हणणे मांडले तेव्हाच सगळा गोंधळ सुरू झाला. वाढतं ट्रोलिंग पाहून आता रिचाने एक लांबलचक पोस्ट लिहून माफी मागितली आहे. पण तिच्यासमोर आता नवीन अडचण उभी राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये द्विवेदी यांनी, ‘‘पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे’’ असा उल्लेख करत पाकिस्तान व्याप्त काश्मीरबद्दल विधान केलं. याच विधानातील मजकुरासहीत द्विवेदी यांचा फोटो एका ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला होता. हा फोटो रिट्वीट करत रिचाने, ‘गलवान सेज हाय’ असं म्हणत ट्विट केलं आहे. या ट्वीटवरुन आता  बराच वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या ट्वीटवरुन रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केला असं म्हटलं आहे. हेही वाचा - Ved teaser out : ‘… आणि मला वेड लागलं’; आपल्या मराठमोळ्या दोस्तासाठी अक्षयचं थेट मराठीत ट्विट रिचाने या ट्वीटमधून भारतीय लष्कराची चेष्टा केल्याचा आरोप अनेकांनी या ट्वीटला रिप्लाय करताना केला आहे. २०२० मध्ये गलवानच्या खोऱ्यामध्ये चीनविरुद्ध झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा हा अपमान आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. भाजपाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी हे ट्वीट अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे. ‘अपमानजनक ट्वीट. हे लवकरात लवकर मागे घेतलं पाहिजे. आपल्या लष्कराचा अपमान करणं योग्य नाही ’’ असं सिंग म्हणालेत.

रिचाचं  हे प्रकरण आता दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. अनेक जण तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करत आहेत. तसं  झालं तर रिचाच्या अडचणी  वाढणार आहेत. रिचाने आता हे ट्विट  डिलीट केलं असलं तरी लोकांच्या विरोधाला तिला सामोरं  जावं लागत आहे.

रिचाच्या या कमेंटने  राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भाजपचे मनजिंदर सिंग यांनी रिचाला ‘थर्ड ग्रेड एक्ट्रेस’ म्हणत मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, रिचाने आता हे ट्विट  डिलीट करण्यासोबतच लष्कराच्या जवानांची माफीही मागितली आहे. ‘‘कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, असे तिने ट्विटद्वारे म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या