मुंबई, 10 ऑक्टोबर : राम गोपाल वर्माचा RGV उर्मिला मातोंडकरने गाजवलेला ‘रंगीला’ (Rangeela) नव्या स्वरूपात येत आहे. आमीर खान (Amir Khan), जॅकी श्रॉफ (jackey Shroff) आणि उर्मिलाच्या (Urmila Matondkar) अभिनयाने नटलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणका उडवला होता. ए. आर. रेहमानचं (A R Rahman) संगीत आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात. आता या ‘रंगीला’ला सलामी देत राम गोपाल वर्मा याचं नवं व्हर्जन घेऊन येत आहेत. ब्युटीफुल असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून RGV नैना गांगुली नावाच्या हॉट तारकेला लाँच करत आहे. उर्मिलाच्या अदांनी रंगीलामध्ये जी कमाल केली होती, ती कमाल आता नैना गांगुली करणार का हे कळेलच. Beautiful- an ode to Rangeela असंच या सिनेमाचं नाव ठेवलं आहे. हेही वाचा - शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था रंगीलासारखीच याची कथा आहे. सर्वसामान्य परिस्थितीत वाढलेले नायक आणि नायिका एकमेकांच्या प्रेमात असतात आणि त्यानंतर आयुष्याला कलाटणी मिळते. नायिका श्रीमंत होते आणि तोच पैसा प्रेमाच्या आड येतो. मनी इज नॉट ऑलवेज ब्युटीफुल या लाइनवर ट्रेलर संपवला आहे. पाहा VIDEO : TikTok वर अवतरली ‘मधुबाला’; सोशल मीडियावर चाहते घायाळ या ट्रेलरमध्ये एकही संवाद नाही, छोट्या छोट्या तुकड्यांमधून कथानक काय असावं याचा अंदाज येतो. रंगीलाचं नवं व्हर्जन असल्यामुळे कथानकात नाविन्य नाही. पण उर्मिलाच्या हॉट अदांना नैना कशी सादर करते हे पाहणं रंजक असेल. वाचा - झिवानं रणवीर सिंहवर केला चोरीचा आरोप, धोनीनं दिलं स्पष्टीकरण 1995 मध्ये रीलिज झालेला रंगीला आजही एक उत्तम चित्रपट म्हणून पाहिला जातो. आता रंगीलाचं नवं व्हर्जन पार्थ सुरी आणि नैना गांगुली या नव्या अभिनेत्यांना पेललं आहे का ते पाहावं लागेल. ट्रेलरमध्ये नैना आणि पार्थ यांच्यातला हॉट रोमान्स दिसला आहे.