JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranveer singh : रणवीर सिंगचा 'पुष्पा' अवतार; अल्लू अर्जुन समोरच म्हणाला 'मै झुकेगा नही'; पहा व्हिडीओ

Ranveer singh : रणवीर सिंगचा 'पुष्पा' अवतार; अल्लू अर्जुन समोरच म्हणाला 'मै झुकेगा नही'; पहा व्हिडीओ

रणवीर सिंगला नुकतेच SIIMA 2022 मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यातीळ रणवीरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात

Ranveer singh and allu arjun

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 सप्टेंबर : रणवीर सिंग हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर त्याचा बिनधास्त स्वभाव चाहत्यांना पसंत पडतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केलेल्या रणवीर सिंगने आजपर्यंत अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. नुकताच रणवीरला त्याच्या ८३ या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअरपुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याला आता सीमा या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मानाच्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. 10वा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (SIIMA) 10 सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता. तिथे रणवीर सिंगने स्टेजवर केलेल्या धमाल डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सीमा या पुरस्कार सोहळ्याला साऊथ इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार्स उपस्थित होते. अल्लू अर्जुन, केजीएफ स्टार यश, कमल हसन, पूजा हेगडे यांसारख्या सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड स्टार रणवीर सिंगनेही हजेरी लावली. या सोहळ्यात रणवीर सिंगला लोकप्रिय हिंदी अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण त्याही पेक्षा त्याने केलेल्या डान्स आणि बोललेल्या डायलॉगमुळे त्याने उपस्थितांची मने जिंकली. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामध्ये रणवीर सिंग फेमस पुष्पा चित्रपटातील डायलॉग बोलत श्रीवल्ली गाण्यावर त्याची गाजलेली स्टेप करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये, रेड कार्पेटवर रणवीर सिंग पांढरा सूट परिधान करताना दिसत आहे. या अवॉर्ड नाईटपासून अल्लू अर्जुन आणि रणवीर सिंगचे अनेक मजेदार क्षण व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसत आहेत. स्टेजवर उभे राहून रणवीरने अल्लूची श्रीवल्लीची सिग्नेचर डान्स स्टेपही रिक्रिएट केली.हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटिझन्सकडूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हेही वाचा- Brahmastra Box Office Collection Day 3: ब्रम्हास्त्रवर नाही बायकॉट बॉलिवूडचा कोणताच परिणाम; 3 दिवसात मोडले रेकॉर्ड रणवीर सिंगला दक्षिणेतील सर्वाधिक लोकप्रिय हिंदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. स्टेजवर पुरस्कार घेताना अभिनेत्याने अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाचे कौतुक केले. मैं झुकेगा नहीं हा आयकॉनिक डायलॉग त्याने पुन्हा तयार केला. तो म्हणाला, अल्लू अर्जुनसारखे काम मी करू शकत नाही. हा चित्रपट मी थिएटरमध्ये पाहिला नाही याचे मला वाईट वाटते. मी हा चित्रपट माझ्या पत्नीसोबत सोफ्यावर बसून पाहिला आहे. पण पुष्पा २ मी नक्कीच पाहीन. अभिनेत्याच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचं तर  रणवीर पुढे रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ देखील आहे. आगामी चित्रपटासाठी तो दक्षिणेतील दिग्दर्शक शंकरसोबत काम करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या