JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Filmfire मिळताच रणवीर झाला रोमँटिक; बायकोला सगळ्यांसमोर केलं किस, Video व्हायरल

Filmfire मिळताच रणवीर झाला रोमँटिक; बायकोला सगळ्यांसमोर केलं किस, Video व्हायरल

फिल्म फेअर अवॉर्ड मिळताच रणवीर आनंद गगनात मावेनासा झाला आणि अभिनेत्यानं पळत जाऊन सर्वांसमोर दीपिकाला किस केलं. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता रणवीर त्याच्या बायकोवर किती प्रेम करतो हे काही सांगायची गरज नाही. बायकोवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी रणवीर कधीच सोडत नाही. नुकतात फिल्मफेअर पुरस्कार 2022 रंगला. यात अनेक बॉलिवूड कलाकारांसह अनेक मराठी कलाकारांनी फिल्मफेअरची ब्लॅक लेडी आपल्या घरी घेऊन गेले. अभिनेता रणवीरला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला. अवॉर्ड मिळताच रणवीर आनंद गगनात मावेनासा झाला आणि अभिनेत्यानं  पळत जाऊन सर्वांसमोर दीपिकाला किस केलं. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फिल्म फेअर अवॉर्डमध्ये रणवीर सिंहला बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळाला.  रेड सूटमध्ये रणवीरनं दणक्यात स्टेजवर एंट्री केली.  83 या सिनेमातील धमाकेदार अभिनयासाठी रणवीरला बेस्ट अॅक्टर म्हणून सन्मानित करण्यात आलं. फिल्मफेअर अवॉर्डसाठी अभिनेत्री आणि रणवीरची बायको दीपिका पादुकोन देखील उपस्थित होती.  रणवीरला मिळालेल्या अवॉर्डचं खास वैशिष्ट्य म्हणजे बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड त्याला बायको दीपिकाच्या हातून मिळाला.  83 सिनेमातही दीपिकानं कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका केली होती. अभिनेत्याला अवॉर्ड देताना आणि बायकोच्या हस्ते अवॉर्ड घेताना दोघांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या

हेही वाचा - Filmfare Awards: मराठमोळ्या सई ताम्हणकरने पटकावला फिल्मफेअर, पाहा लिस्टमध्ये आणखी कोण अवॉर्ड घेण्यासाठी रणवीर स्टेजवर पोहोचताच त्यानं दीपिकाला घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केलं. त्यांच्या या रोमँटिक क्षणी सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. रणवीरला अवॉर्ड देताना दीपिका देखील कुल अंदाजात दिसली.  दोघांचा रोमँटिक अंदाज कॅमेरात कैद झालाय. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फिल्मफेअर अवॉर्डमध्ये रणवीरचं हायलाईट ठरला. बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड आपल्या नावे केला. आपल्या लव्ह लेडीबरोबर रोमान्स करताना दिसला आहे आणि त्यांच्या दमदार परफॉरमन्सनं सगळ्यांना खुश करुन सोडलं. पद्मावत सिनेमातील गाण्यावर एनर्जेटिक डान्सने रणवीरनं माहोल बनवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या