JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : रानू मंडलनंतर आता या मुलीचा आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

VIDEO : रानू मंडलनंतर आता या मुलीचा आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

हिमेश रेशमियाच्या एका सिनेमातून प्लेबॅक सिंगर म्हणून डेब्यू केल्यानंतर आता रानू यांच्या सारखंच टॅलेंट असलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर : कधी रेल्वे स्टेशनवर गाणं गात आपली गुजराण करणाऱ्या रानू मंडल आता प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांच्या जादुई आवाजानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रानू यांचं आयुष्य रातोरात बदललं. नशीबाच्या जोरावर त्यांनी हिमेश रेशमियाच्या एका सिनेमातून प्लेबॅक सिंगर म्हणून डेब्यू सुद्धा केला. त्यानंतर आता रानू यांच्या सारखंच टॅलेंट असलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लहान मुलीचा आहे. या मुलीचा आवाज इतका दमदार आहे. एवढी लहान मुलगी इतकं सुंदर गाऊ शकते यावर विश्वास बसत नाही. या व्हिडीओमध्ये ही मुलगी एका म्युझिक ग्रुपसोबत गाताना दिसत आहे. ती एका कार्यक्रमात गात असून तिनं आपल्या आवाजनं सर्वांची मनं जिंकली आहेत. ही मुलगी ‘जिंदगी है तेरे नाल’ हे पंजाबी गाणं गाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. ‘हा तर रणबीरच्या संगतीचा परिणाम’ बॉडीगार्डशी उद्धट वागल्यानं आलिया झाली ट्रोल

या मुलीचा आवाज ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. त्यामुळेच की काय हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रानू मंडल यांच्यानतर ही मुलगी सुद्धा व्हायरल होईल असं म्हटलं जात आहे. पण पुढे काय होणार हे येणाऱ्या काळात समजेलच. ही मुलगी कुठली आहे, तिचं नाव काय आहे याबाबत मात्र कोणतीही माहिती अदयाप मिळालेली नाही. सोनाली कुलकर्णीच्या ‘विक्की वेलिंगकर’ला तुम्ही भेटलात का?

रानू मंडल यांच्याबद्दल बोलायचं तर रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक ‘आदत’ नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘आदत’नंतर रानू मंडल हिमेशसोबत ‘आशिकी में तेरी…’ साठी सुद्धा काम करणार आहे. TRP मीटर : प्रेक्षकांची पसंती कायम, तरीही ‘या’ मालिकेला मिळाली बढती ======================================================== मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या