JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा रिलीजपूर्वी सोशल मीडियावर 'जाळ अन् धुरळा'

रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा रिलीजपूर्वी सोशल मीडियावर 'जाळ अन् धुरळा'

‘तेरी मेरी कहानी’नंतर आता रानू मंडल यांचं ‘आदत’ नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर : सोशल मीडिया स्टार रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक ‘आदत’ नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी हिमेशनं या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ सोशल  शेअर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या गाण्याचा म्यूझिक ट्रॅक हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रानू यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना हिमेशनं लिहिलं, रानू मंडल यांचा आवाज खूपच गोड आहे. ‘आदत’च्या रेकॉर्ड दरम्यान मला ही गोष्ट जाणवली की, रानू या वन साँग वंडर नाहीत. जेव्हा तुम्ही आदत ऐकाल तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात येईल. त्यांचा आवाज खरंच शानदार आहे. गुरू-राधिकानं स्वीकारलं समर-सुमीचं चॅलेंज, कलाकारांची अशी ‘ही’ लगीनघाई

‘आदत’नंतर रानू मंडल हिमेशसोबत ‘आशिकी में तेरी…’ साठी सुद्धा काम करणार आहे. याआधी रिलीज झालेलं त्यांंचं डेब्यू साँग ‘तेरी मेरी कहानी’ खूप हिट झालं. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं तिला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. भन्साळी करतायत मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती, चर्चा मात्र पोस्टरवरच्या हिरोची! रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू गात असेलेलं लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यांनी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली. नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी अंगद बेदी म्हणतो… ============================================================== SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या