मुंबई, 21 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूजच्या आत्महत्येचा धक्का त्याचे चाहतेच काय तर बॉलिवूडकर सुद्धा अद्याप पचवू शकलेले नाहीत. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहेत. बॉलिवूडमध्ये आऊटसायडर्ससोबत भेदभाव केला जातो असं बोललं जात आहे. यावर नुकतीच कंगनानं आपली प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर आता तिची बहीण रंगोली चंडेलनं सुशांतच्या आत्महत्येबाबत इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. रंगोली चंडेलनं सुशांत सिंह राजपूत, अंकिता लोखंडे आणि त्यांचा मित्र संदीप सिंह यांचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. याआधी संदीपनं सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा देत ही पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यानं सुशांत-अंकिताबाबत अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. त्याच्या याच पोस्टवर प्रतिक्रिया देताना रंगोलीनं लिहिलं, ‘संदीप तू बरोबर लिहिलं आहेस. सुशांतनं बॉलिवूडमध्ये आल्यानंतर स्वतःसाठी एक महागडी पीआर टीम नेमली होती. जी मूव्ही माफियांसाठी सुद्धा काम करत होती. त्यांनी सुशांतला सांगितलं की, त्यानं स्वतःसाठी दुसरा पार्टनर शोधायला हवा. इथे लोक प्रेम करत नाहीत तर केवळ ब्रांडिगसाठी प्रेमात असतात. त्यामुळे तू सुद्धा स्वतःचा वेगळा ब्रांड तयार कर असं त्याला सांगितलं गेलं होतं.’ सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोल; या 3 सेलेब्रिटींनी ट्विटरवरून काढला पळ
रंगोलीनं पुढे लिहिलं, ‘त्याच्या महागड्या पीआर टीमनं सांगितलं होतं, हीच ती वेळ आहे जिथे तुला तुझ्या कमजोर बाजू विसराव्या लागतील आणि कोणत्यातरी सुपर मॉडेलला डेट करावं लागेल. रणवीर आणि रणबीर सारखं. एखादं असं कनेक्शन बनव ज्याचं फिल्मी बॅकग्राऊंड चांगलं आहे. हे तुझ्या इमेजसाठी चांगलं नाही आहे की, तू एका टीव्ही अभिनेत्रीसोबत राहतोस. तुला जर मोठ्या रेसचा भाग व्हायचं असेल तर तुला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल. नाहीतर तू स्ट्रगलिंग अभिनेताच राहशील.’ Father Day 2020: ‘तुम्ही माझं आयुष्य पूर्णपणे बदललं’,करणचं मुलांसाठी हे खास पत्र रंगोलनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, अंकिता आणि सुशांतनं नवीन घर खरेदी केलं होतं. पण नंतर तो तिला सोडून गेला. अंकिता त्यावेळी पूर्णपणे खचली होती. पण या लोकांनी सुशांतचं बॅकबोन तोडलं होतं. तो वांद्रे येथे शिफ्ट झाला. नकली मित्रांसोबत राहू लागला. सुपरमॉडेलला डेट करणं सुरू केलं. पण यात तो स्वतः कुठेतरी हरवला. मला जेव्हा ही गोष्ट एका कॉमन फ्रेंड कडून समजली तेव्हा मी विचार केला हे किती दिवस काम करेल. शेवटी तेच झालं. त्यांची रणनिती पूर्ण झाली. त्याच्या खोट्या मित्रांनी आणि पीआर टीमनं त्याची साथ सोडली. तो एकटा पडला आणि डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याला बॅन केलं गेलं. संदीप तू बरोबर बोललास. जर हे सर्व झालं नसतं तर त्याला थांबवता आलं असतं. धक्कादायक! सुशांतच्या आत्महत्येनंतर 6 तरुणांनी संपवलं आयुष्य