JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आलिया भट्टसाठी रणबीर कपूरनं विमानतळावर केलं असं काही की.., Video Viral

आलिया भट्टसाठी रणबीर कपूरनं विमानतळावर केलं असं काही की.., Video Viral

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट ( Alia Bhatt)यांचे रिलेशनशिप कुणापासून लपलेले नाही. आता आलिया आणि रणबीरचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी- रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट **( Alia Bhatt)**यांचे रिलेशनशिप कुणापासून लपलेले नाही. दोघेही अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून यांना ओळखलं जातं. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे कपल काही दिवासपूर्वी बाहेर जाताना मुंबई विमानतळावर स्पॉट झालं होतं. आलिया भट्टने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुट्टी संपवून आता हे क्यूट कपल मुंबईत परतले आहे. आज मुंबई विमानतळावर पापाराझींच्या कॅमेरात स्पॉट झाली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विमानतळावर एकत्र जाताना दिसले. यावेळी रणबीर आलियाबातीत काहीसा प्रोटेक्टीव्ह दिसला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. विमानतळावर या दोघांना एकत्र पाहाताच सर्वांनी एकच गर्दी केली . यावेळी रणबीर एका गुणी बॉयफ्रेंडप्रमाणे आलियाचं गर्दीपासून संरक्षण करताना दिसला. पहिल्यांदा त्यानं तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन केला. तिला पहिल्यांदा कारमध्ये बसवलं व नंतर तो कारमध्ये बसला. चाहत्यांना देखील रणबीरला असं पाहून आनंद झाला आहे. वाचा- आलिया-जान्हवीनं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांकडे केली ‘ही’ विनंती आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टावर शेअर केला आहे. रणबीर-आलियाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. आलिया भट्ट ब्लॅक टॉप आणि ट्राउझर्समध्ये दिसत आहे, तर रणबीर कपूर टी-शर्ट, कार्गो आणि कॅपमध्ये दिसत आहे. नेहमीप्रमाणे रणबीर कपूर खूपच हॅण्डसम दिसत आहे. या दोघांचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे. यावेळी रणबीरच्या एका कृतीन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाचा- बॉलिवू़डमध्ये कोरोनाचा कहर! आज तीन नावांची पडली भर, एकतालाही लागण आयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याशिवाय अमिताभ बच्चन देखील आहेत. याशिवाय चित्रपटात नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच केले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

आलिया भट्ट ‘RRR’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ व ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिने फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा सिनेमा देखील साइन केला आहे. ज्यामध्ये ती, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या