राखी सावंत
मुंबई, 7 ऑक्टोबर : ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही सतत चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ती प्रसिद्धी झोतात येत असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. अशातच राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचे तिचे स्वप्न सांगितले आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखी सावंतने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, तिला मुख्यमंत्री केले तर काय करायला आवडेल. जर मला या देशाची मुख्यमंत्री बनवले तर मी ड्रीम गर्ल हेमा मालिनी जीचे गोरे गाल आणि गोरी कंबरसारखे रस्ते बनवेल. आमच्या ड्रीमगर्लसारखे रस्ते मी सुंदर बनवीन. हेमा मालिनी जींचे सौंदर्य, त्यांचा चेहरा, त्यांचे शरीर, तिची कंबर अशा खड्ड्यांपुढे मी जाणार नाही. तुम्ही हे विनोदामध्ये घेऊ नका. हेही वाचा - VIDEO: गरोदर आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट; पाहून तुम्हीही व्हाल खुश राखी पुढे म्हणाली की, चहा बनवताना मोदीजी पंतप्रधान झाले, तर बसून, पडून, हसत असताना मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. सध्या राखीचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, बिग बाॅसमुळे राखी चांगलीच प्रकाशझोतात आलेली पहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय.