राखी सावंत
मुंबई,14 जानेवारी- बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंत ला ओळखलं जातं. राखी सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आली होती. तर आता अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या चार दिवसांपासून राखी सावंतचं लग्न चर्चेचा विषय बनला आहे. कारण एकीकडे राखी म्हणते आमचं लग्न झालय तर दुसरीकडे आदिल खान दुर्रानी म्हणतो मला सत्य समोर मांडण्यासाठी अजून काही हवा. दरम्यान आदिलने राखीला फसवल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता राखीने एक भावुक व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच चकित केलं आहे. राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. राखी बऱ्याचवेळा मजेशीर कन्टेन्ट शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते हसून लोटपोट होत असतात. राखीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळत असतो. मात्र राखीची लेटेस्ट पोस्ट पाहून सर्वच चकित झाले आहेत. राखीसोबत नेमकं काय सुरु आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वच या तिच्या सोशल मीडियाकडे लक्ष देऊन आहेत. (हे वाचा: Rakhi Sawant: लग्नानंतर राखी सावंतने बदललं आपलं नाव; समोर आलं अभिनेत्रीचं नवं नाव ) नुकतंच राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये राखीने आपल्या कपड्यांमध्ये एक व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला राखीने केशरी रंगाची ओढणी आपल्या डोक्याला बांधली आहे. इथून हा व्हिडीओ सुरु होतो. व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये अतिशय भावुक डायलॉग्स ऐकायला मिळत आहेत. यामध्ये ऐकायला मिळत आहे, ‘मीसुद्धा एक माणूस आहे. मलासुद्धा त्रास होतो. लोक माझा चेहरा पाहून काय म्हणतील. ज्या देवाने तुला बनवलं आहे त्याच देवाने मलासुद्धा बनवलं आहे. देवाने बनवलेल्या ज्या जमिनीवर मी चालत आहे त्याच जमिनीवर तूसुद्धा चालत आहेस.
‘परंतु तू मान वर करुन चालत आहेस आणि मी मान खाली घालून चालत आहे. तुझ्याजवळ संपत्ती आहे माझ्याजवळ ती नाही. मी लोकांचं बोलणं ऐकून घेऊन जगते. मला आता त्याची सवय झाले. त्यामुळे मला काही नाही वाटतं’. असा व्हिडीओ शेअर करत राखीने सर्वंनाच भावुक केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर राखी सावंत आणि आदिल दुर्रानीच्या लग्नाचा मोठा हंगामा सुरु आहे. या दोघांच्या लग्नाबाबत लोकनाना विविध प्रश्न पडले आहेत. लग्न झालंय कि नाही? याबाबतसुद्धा अनेकांना शंका आहे. दरम्यान याबाबत बोलण्यासाठी आदिल दुर्रानीने एका मुलाखतीत दहा ते बारा दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांनतर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन यावर सर्व प्रश्नांची असल्याचं म्हटलं आहे.