JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rakhi Sawant : 'तू खूप भयानक दिसतेस'; राखीला नो-मेकअप लुकमध्ये पाहून नेटकरी हैराण

Rakhi Sawant : 'तू खूप भयानक दिसतेस'; राखीला नो-मेकअप लुकमध्ये पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर राखी सावंतचे अनेक फनी व्हिडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. अशातच राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी राखी तिच्या लुकमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 ऑगस्ट : ‘एंटरटेंनमेंट क्वीन’ आणि ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant)ही सतत चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ती प्रसिद्धी झोतात येत असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. अशातच राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी राखी तिच्या लुकमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. राखी सावंतनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती बाईक राईड घेताना दिसत आहे. राखीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिचा नो-मेकअप लुक पहायला मिळत आहे. मात्र राखीने बाइकवर हेल्मेट घातलेले नाही आणि ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे, यामुळे ती ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत तिला ट्रोल करत आहे. हेही वाचा -  Pushpa Impossible: जेव्हा रील लाइफ पुष्‍पा रीअल लाइफ पुष्‍पाला भेटते, वाचा हृदयस्‍पर्शी संवाद राखीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रकारच्या कमेंट करत आहे. ‘सर्जरी करुन करुन चेहरा खराब झालाय, बिना मेकअपची भयानक दिसतेय, अब बुढापा दिखने लगा’, अशा अनेक कमेंट राखीच्या या व्हिडीओवर येताना दिसतायेत. राखीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे.

संबंधित बातम्या

राखी सावंतने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आज सकाळी मी जिममध्ये गेले होते, जिम बंद होती, म्हणून मी माझ्या किक बॉक्सिंग सर राजू दास यांच्यासोबत कॉफी घ्यायला गेले होते.’ बिग बाॅसमुळे राखी चांगलीच प्रकाशझोतात आलेली पहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या