मुंबई, 13 फेब्रुवारी - Rakhi Sawant Riteish Separation: राखी सावंतच्या (Rakhi Sawant) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ज्या बिग बॉस 15 घरात राखीने पती रितेशची सर्वांना ओळख करून दिली होती. त्याच रितेशपासून राखीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. राखीने इन्स्टावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिनं पोस्ट म्हटलं आहे की, ती आणि रितेशने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. राखी सावंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, प्रिय चाहत्यांनो मला एकच सांगायचे आहे की मी आणि रेतेशने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉसनंतर अशा काही गोष्टी घडल्या ज्या मला माहित देखील नव्हत्या. काही गोष्टी माझ्या नियंत्रणा पलीकडील होत्या. आम्ही दोघांच्यातील मतभेद कमी कऱण्याचा पयत्न केला. तसेच काही गोष्टींवर काम केरण्याच देखील प्रयत्न केला. मात्र मला वाटतं की, दोघांनीही चांगल्यापणे पुढे जावे आणि आयुष्याचा आनंद घ्यावा.
तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी खऱंतर खूप दुखी आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधीच माझ्यासोबत असं व्हायचं होतं का? मात्र निर्णय तर घ्यावा लागेल. मी रितेशला शुभेच्छा देते. आयुष्याच्या या टप्प्यावर मला माझ्या कामावर आणि माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवायचं आहे. मला नेहमी समजून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद!’ वाचा- ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील सोज्वळ नेहाचा बोल्ड अवतार पाहून थक्क व्हाल! यापूर्वी राखीने दिलेल्या एका मुलाखतीत रितेशसोबतच्या तिच्या नात्यावर भाष्य केले होते. राखी सावंत म्हणाली होती की, मी याबाबत आत्ताच काही बोलू शकत नाही. सध्या आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. त्यावेळी तिला विचारण्यात आले होते की, घरात तमुचे नाते काय होते? यावर तिनं पती-पत्नी असं उत्तर दिलं होते. मी आता यावर काहीही बोलू शकणार नाही. घऱातून बाहेर आल्यावर आम्ही मित्र आहोत. काही कायदेशीर बाबी आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तिनं सांगतिल होतं.