JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राखी सावंत बिना चप्पलची का फिरतेय, सलमान खानचा याच्याशी काय आहे संबंध ?

राखी सावंत बिना चप्पलची का फिरतेय, सलमान खानचा याच्याशी काय आहे संबंध ?

अभिनेत्री राखी सावंत ही सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. राखी कधी काय करेल याचा कोणच अंदाज लावू शकत नाही. आता तिनं सलमान खानसाठी एक अनोख नवस केलं आहे.

जाहिरात

भाईजानसाठी कायपण..

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जुलै- ड्रामा क्विन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि कमेंटचीही नेहमीच चर्चा होते. राखी आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. आता याच सलमानसाठी राखीनं अनोखा नवस केला आहे. भाईजानंचं लग्न व्हावं म्हणून राखीनं अनोखी मन्नत मागितली असून त्यासाठी ती अनवाणी फिरत आहे. राखीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राखी पिंक कलरच्या ब्लेझरने डोके झाकताना दिसत आहे.शिवाय ती अनवाणी चालताना दिसत आहे. राखी म्हणतेय की,   मी नवस केलाय. सलमान खानने लग्न करावं मी श्रीलंका, दुबई येथून विना चप्पल आली आहे. जोपर्यंत सलमानचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. वाचा- न्यासा माझ्यापेक्षा सभ्य आहे; काजोलने बांधले लेकीच्या कौतुकाचे बंगले राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. राखीचे लग्न आदिल खानसोबत झाले होते. लग्नानंतर तिने आदिलवर अनेक आरोप केले होते, त्यानंतर त्याला 7 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंधाचा आरोपही केला होता. राखीच्या व्हिडिओवर यूजर्स खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले  आहे की, मग ती मरेपर्यंत चप्पल घालणार नाही. तर एकाने लिहिले  आहे की,  राखी पागल झाली आहे. काहीही करत राहते. त्याचबरोबर अनेक लोक हसणारे इमोजी पोस्ट करत आहेत.

संबंधित बातम्या

अलीकडेच राखीने आदिलपासून घटस्फोट घेत असल्याने ब्रेकअप पार्टीचे आयोजन केले होते. तिच्या या ब्रेकअप पार्टीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसत आहे. ती म्हणाली होती की मी शेवटी घटस्फोट घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी आहेत पण मी आनंदी आहे.

राखीला प्रत्येकवेळी सलमान खानने मदत केली आहे. तिच्या आईच्या आजरापणात देखील सलमान खान तिच्या मदतीला धावून आला होता. यासाठी राखीनं सलमान खान आणि सोहेल खानचे आभार देखील मानले होते. सलमानला ती नेहमीच भाऊ मानत आली आहे. प्रत्येकवेळी सलमान तिच्यासाठी उभा राहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या