राखी सावंत
मुंबई, 16 फेब्रुवारी : राखी सावंत सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आईचं आजारपण, निधन आणि पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना सामोरं जात आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या तो तुरुंगात आहे. एवढंच नाही तर राखीला सुद्धा काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. याचं कारण होतं अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिच्यावर गंभीर आरोप केले होते. या दोघींचा छत्तीसचा आकडा आहे. पण आदीलला तुरुंगात धाडताच राखीने आता नवा ड्रामा सुरु केला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत या दोघी एकमेकींच्या दुश्मन असल्यासारखं वागतात. मीडियासमोर येत एकमेकींची उणीधुणी काढतात. शर्लिन आणि राखी वेळोवेळी कॅमेऱ्यासमोर एकमेकांविषयी वाईटच बोलताना दिसतात. पण राखीच्या आयुष्यातून आदिलने एक्झिट घेताच आता चित्र पालटलं आहे. या दोघींचं वैर विसरून मैत्री झाली आहे. हेही वाचा - Priyanka Chaudhary: एमसी स्टॅनचं नाव ऐकताच प्रियांकाने केलं असं काही; पाहून नेटकरी म्हणाले ‘तिचा जळफळाट…’ नुकताच या दोघींचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये शर्लिन तिच्या नवीन मैत्रिणीला राखीला फुले देताना दिसत आहे. यादरम्यान ती राखीच्या गालावर किस करते. याशिवाय दोघांचा आणखी एक व्हिडिओ देखील चर्चेत आहे, ज्यामध्ये शर्लिन-राखी एकत्र बसून गप्पा मारताना दिसत आहेत.शर्लिनकडे बघून राखी म्हणाली कि, ‘मी प्रेमात असताना लग्न केलं. काही समजलं नाही, उद्ध्वस्त होत राहिले.‘राखीचं बोलणं ऐकून शर्लिन म्हणाली- ‘आम्ही ९ फेब्रुवारीला संध्याकाळी भेटलो. मी राखीला विचारले की तुला तुझ्या आयुष्याचा राजकुमार सापडला आहे, मग तू आनंदी का नाहीस? मग मला कळले की अदिलने तिची कशी फसवणूक केली आहे, त्याने लोकांना मूर्ख बनवले. तो लोकांची फसवणूक करतो.’
शर्लिन पुढे म्हणाली, ‘जेव्हा राखीने मला सांगितले की तिच्या पतीने म्हैसूरमधील एका इराणी मुलीवर लैंगिक अत्याचार केले, तेव्हा मला धक्का बसला. मला वाटले, अरे देवा, हे काय चालले आहे. या माणसाने अनेक महिलांवर अन्याय केला आहे.’ अशा भावना शर्लिनने राखीविषयी व्यक्त केल्या आहेत. राखी आणि शर्लिनची मैत्री पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलंय कि ‘ज्या एकमेकांच्या शत्रू होत्या, त्या आज पक्क्या मैत्रीणी बनल्या आहेत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले- ‘दोघेही नंबर वन ड्रामेबाज आहेत, ‘दोन ड्रामा क्वीन्स एका फ्रेममध्ये’ अशा कमेंट केल्या आहेत.
राखी सावंतचे आयुष्य गेल्या काही काळापासून अडचणीत आले आहे. आधी तिची आई वारली आणि आता तिचे पती आदिल खानसोबतचे नाते आणखी बिघडले आहे. राखीने आदिलवर फसवणूक आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. याच कारणामुळे आदिल अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. राखीच्या लग्नाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. राखी आणि अदिलचं हे प्रकरण किती पुढे जातंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.