Jr NTR
नवी दिल्ली, 9 जानेवारी: बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेली अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. एसएस राजामौलींची आगामी ‘आरआरआर’ (RRR)सिनेमा 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा(Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान या चित्रपटाची Inside story समोर आली आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटासाठी ज्यूनियर एनटीआरला (Jr NTR) किती मेहनत घ्यावी लागली याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस.राजामौली यांनी केला आहे. एका कार्यक्रमात राजामौली यांनी ज्युनियर एनटीआरच्या व्यक्तिरेखेबद्दल भाष्य केले आहे. ‘त्याने आपल्या चित्रपटासाठी हिंदी भाषेत बोलण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तो जंगलात अनवाणी धावला. असे सांगत ‘आरआरआर’ सर्व भाषांच्या लोकांच्या हृदयावर राज्य करण्यास सज्ज आहे.’ अशी भावना राजामौली यांनी यावेळी व्यक्त केली. एनटीआरच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना राजामौली म्हणाले, चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील व्यक्तिरेखेनुसार शरीर बनवण्यासाठी त्याला जवळपास पाच ते सहा महिने लागले. विशेष म्हणजे बल्गेरियाच्या जंगलात तो अनवाणी धावला.
ज्युनिअर एनटीआर याने त्याच्या या सीनची रिहर्सल शूज परिधान केली होती. मात्र ज्यादिवशी हा सीन चित्रित झाला त्यादिवशी त्याने सर्वांनाच चकित केले. या सीनच्या शूटींगदरम्यान त्याला बल्गेरियाच्या काटेरी जंगलात अनवाणी धावण्याची सूचना करण्यात आली. विशेष म्हणजे त्यानेही तो सीन अनवाणी केला. पण सुदैवाने त्याच्या पायला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र जंगलातील टोकेदार दगडांवर त्याचा पाय पडल्यामुळे त्याला काही प्रमाणात दुखापत झाली होती. अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt), ज्यूनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बाहुबली नंतर एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा मल्टि स्टारर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आरआरआर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ आणि ‘जननी’ या गाण्यांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.