JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राखी सावंतने घेतली राज कुंद्राची भेट, VIDEO शेअर करत म्हणाली...

राखी सावंतने घेतली राज कुंद्राची भेट, VIDEO शेअर करत म्हणाली...

राखीने राज कुंद्रासोबतचा एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी राज कुंद्रात्याच्या वाईट काळात कशाप्रकारे बॉलिवूडने त्याची साथ सोडली यावरून बोलताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शमिताची बहीण अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा**(Raj Kundra)** देखील दिसला होता. शमिताच्या बर्थडे पार्टील अनेक कलाकार सहभागी झाले होते. विशेष करून बिग बॉसचे स्पर्धक सर्वांचे लक्षवेधून घेत होते. राज कुंद्राने त्याच्या रेस्टॉरंटमध्ये ही पार्टी आयोजित केली होत. यामध्ये राखी सावंत **(Rakhi Sawant)**देखील सहभागी झाली होती. राखीने राज कुंद्रासोबतचा एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी राज कुंद्रा राखी सावंतचे कौतुक करत आहे. शिवाय त्याच्या वाईट काळात कशाप्रकारे बॉलिवूडने त्याची साथ सोडली यावरून बोलताना दिसत आहे. राज कुंद्रा या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे की, राखी बॉलिवूडमधील एक खरी व्यक्ती आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो. ती एकमेव व्यक्ती आहे जी खऱ्याच्या पाठीमागे उभी राहिली. तर राखी सावंतने देखील राज कुंद्रा माझा भाऊ आहे असं म्हणतं त्याचे कौतुक केले. वाचा- माधुरी वाढवणार OTT ची धकधक, कधी होणार तिची पहिली सिरीज रिलीज? राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी जेलमध्ये राहावे लागले होते. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या वाईट काळात शिल्पा व राज कुंद्रा यांच्यावर बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सने आरोप केले तर काहींनी पाठींबा देखील दिला. राखी सावंतने देखील त्या काळात शिल्पाला पाठींबा दर्शवला होता.

संबंधित बातम्या

राज कुंद्राने जामीन मिळाल्यानंतर एक स्टेटमेंट जाहीर केले होते.या संपूर्ण प्रकरणावर त्याने मत मांडले होते. खूप विचार केल्यानंतर आणि काही बेताल वक्तव्य आणि लेखांचा विचार करता मला एक सांगायचे आहे की, माझ गप्प राहणं माजी मजबुरी समजू नये असे त्याने म्हटले होते. मी माझ्या आयुष्यात कधीच पॉर्नोग्राफी आणि डिस्ट्रिब्यूशनमध्ये सहभागी नसल्याचे राज कुंद्राने सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या