JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पॉर्नोग्राफी प्रकरणात Raj Kundra चा खळबळजनक दावा; अधिकाऱ्यावर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी

पॉर्नोग्राफी प्रकरणात Raj Kundra चा खळबळजनक दावा; अधिकाऱ्यावर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी

उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. राज कुंद्राचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली.

जाहिरात

Raj Kundra

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय, मुंबई 30 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. राज कुंद्राचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. अशातच राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज कुंद्रा याने केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पोर्नोग्राफी प्रकरणात गोवले असल्याचा दावा राज कुंद्राने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुंद्राने आपल्या तक्रारीत असाही दावा केला आहे की, आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला एका व्यावसायिकाने त्याच्या वैयक्तिक सूडबुद्धीने रचला होता. ज्याने मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला पोर्नोग्राफी रॅकेटच्या कथित खोट्या प्रकरणात अटक केली होती. सीबीआयने त्याच्यावर दाखल केलेल्या याच गुन्ह्याची पुन्हा चौकशी करावी, जेणेकरून त्याला न्याय मिळेल अशी मागणीही राज कुंद्राने केली आहे. हेही वाचा -  Shaan Mukherji B’day: 13 व्या वर्षीच वडिलांचं निधन, घर चालवण्यासाठी शानला करावं लागलं होतं ‘हे’ काम ‘मी एक वर्ष गप्प राहिलो आणि मीडिया ट्रायलपासून दूर राहिलो, मी आर्थर रोड जेलमध्ये 63 दिवस काढले आहेत. मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, जो मला मिळेल, हे मला माहीत आहे, या अधिका-यांच्या विरोधात मी चौकशीची विनंती करतो’, असं राज कुद्रांने तक्रारीमध्ये लिहिलं आहे.

राज यांनी आपल्या तक्रारीत काही अधिकाऱ्यांची नावेही लिहिली आहेत आणि ते पत्र पंतप्रधानांना पाठवलं असल्याचंही बोललं जातंय. राजच्या म्हणण्यानुसार, हॉटशॉट अॅप त्याच्या भावजयीचे होते आणि ते अॅप अश्लील नव्हते. च्या कंपनीने फक्त तेच सॉफ्टवेअर दिले ज्यावर ओटीटी अॅप चालू शकते. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीशी माझा काहीही संबंध नसल्याचंही राज कुंद्रानं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या