JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राहुल देशपांडेंना 'लाल सिंह चढ्ढा'च्या समर्थानातील 'ती' पोस्ट भोवली; द्यावं लागलं स्पष्टीकरण

राहुल देशपांडेंना 'लाल सिंह चढ्ढा'च्या समर्थानातील 'ती' पोस्ट भोवली; द्यावं लागलं स्पष्टीकरण

राहुल यांनी स्वतः पोस्ट लिहत याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’ आज 11 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीदेखील केली जात आहे. दरम्यान मराठी गायक राहुल देशपांडे यांनी या चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थिती लावली होती. सोबतच चित्रपटातील कलाकारांचं कौतुक करत एक पोस्ट शेअर केली होती. परंतु त्यांनतर सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांनतर राहुल यांनी स्वतः पोस्ट लिहत याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल देशपांडे यांनी काही वेळेपूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहलं होतं. ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट खूप मनापासून बनवलेला आहे. हा चित्रपट आपल्याला आतून ढवळून काढतो. यामध्ये आमिर खानचा उत्कृष्ट अभिनय आणि करीना कपूर आणि मोना सिंहची अप्रतिम कामगिरी आहे. तसेच आपल्याला प्रिमियरला बोलावल्याबद्दल त्यांनी आभारसुद्धा व्यक्त केलं होतं.

त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी अतिशय तिखट शब्दांत त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. फेसबुक आणि ट्विटरवरसुद्धा त्यांच्या या पोस्टला रोषाचा सामना करावा लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहात, राहुल देशपांडे यांनी आणखी एक पोस्ट लिहली आहे. ही पोस्ट लिहत त्यांनी आपलं मत मंडळ आहे.

**(हे वाचा:** VIDEO: ‘एक आमदार की किमत…’; बस बाई बसच्या मंचावर पंकजा मुंडेचा अनोखा अंदाज ) या नव्या पोस्टमध्ये राहुल यांनी लिहलंय, ‘‘नमस्कार मित्रहो, लाल सिंह चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमियरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे व त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही. आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे व मला त्याचा अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करुन घेऊ नये. अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती आहे!लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या