JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra नं सांगितलं मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचं महत्त्व ; पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्यानंतर आला होता 'हा' विचार

Priyanka Chopra नं सांगितलं मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचं महत्त्व ; पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्यानंतर आला होता 'हा' विचार

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत तिनं जेव्हा पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तिला कसं वाटलं होतं, याबद्दल सांगतान दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जानेवारी- बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) निक जोनास याच्याशी लग्न केल्यानंतर (Nick Jonas) आता विदेशी बहू झाली आहे. प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीने लग्न केलं आहे. लग्नानंतर अनेकवेळा प्रियांकाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खरं तर ज्वेलरी ब्रॅंडचा आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून तिनं सांगितलं आहे की, तिनं पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तिला कसं वाटलं होतं. प्रियांका चोप्रा या व्हिडिओत म्हटलं आहे की, मी पहिल्यांदा माझं मंगळसूत्र घातलं होतं तो दिवस मला आजही आठवत आहे. कारण आपण सगळे याचे महत्त्व जाणतो आणि याच वातावरणात आपण वाढलो आहे. माझ्यासाठी तो क्षण खूप महत्त्वाचा होता. मी जरी स्व:ताला मॉर्डन म्हणवत असले तरी त्यावेळी मला त्याचं महत्त्व समजत होते. मला मंगळसूत्र घालायला देखील आवडते. शेवटी ती आपल्या वडिलधाऱ्यांकडून आपल्याला मिळाली आहे. पण त्याच बरोबर मी सुद्धा अशा पिढीतली आहे, जी कुठेतरी मध्यभागी आहे. ज्यांना परंपरा पाळायला आवडतात पण आपण काय आहोत हे देखील माहित आहे. वाचा- ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीने खऱ्या लेकीसाठी लिहिली खास पोस्ट प्रियांका चोप्रा या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे की, आम्हाला माहिती आहे की, आम्ही आता कुठे उभे आहे. आमच्या पुढच्या पिढीतील मुली काहीतरी वेगळे करताना दिसतील. तसेच तिनं या व्हिडिओत हे देखील सांगितले आहे की, ती कशाप्रकारे आपल्या परंपरा पुढे नेहण्याचा प्रयत्न करते.

संबंधित बातम्या

मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व सांगताना दिसली प्रियांका मंगळसूत्रात काळे मणी का घालतात, याबद्दल देखील प्रियांका चोप्रा सांगताना दिसली. ती म्हणली की, काळा रंग वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करतो त्यामुळे मंगळसूत्राता काळे मणी घालतात. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर तिनं मुंबईत बॉलिवूड सेलेब्सना मोठे रिसेप्शन दिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या