JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra : 'मला तिथे काळी मांजर बोलायचे...'; जागतिक स्तरावर प्रियांकानं सांगितलं बॉलिवूडचं कटू सत्य

Priyanka Chopra : 'मला तिथे काळी मांजर बोलायचे...'; जागतिक स्तरावर प्रियांकानं सांगितलं बॉलिवूडचं कटू सत्य

प्रियांकाने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या स्त्री-पुरुष भेदभाव, त्यांना पुरुष कलाकारांपेक्षा कमी पगार कसा मिळतो, सेटवर तासनतास थांबावे लागले आणि त्याच्या रंगाबद्दल आणि बॉडी शेमिंगबद्दल कटू गोष्टी ऐकाव्या लागतात याविषयी मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

प्रियांका चोप्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 डिसेंबर :  प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही एक प्रसिद्ध नाव आहे. प्रियांकाने जागतिक स्टार म्हणून तिची ओळख निर्माण केली आहे. आता देशातच नाही तर परदेशातही तिचे चाहते प्रचंड आहेत यात शंका नाही. आज लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या प्रियांका चोप्राला एके काळी तिच्या रंगाबाबत बॉडी शेमिंग आणि भेदभावाचा सामना करावा लागला. प्रियांकाने तिला बॉलीवूड इंडस्ट्रीत मिळालेल्या वाईट वागणुकीचा खुलासा केला आहे. बीबीसी च्या ‘100 वुमन दिस इयर..’ या कार्यक्रमात अभिनेत्रीनं याविषयी मोठा खुलासा केला आहे. प्रियंका चोप्रा जोनासचा समावेश  बीबीसीच्या ‘100 महिलांच्या यादीत झाला आहे. ही अभिनेत्री 2022 मधील सर्वात प्रभावशाली महिला बनली आहे. यावेळी बीबीसीशी संवाद साधत त्यांनी बॉलिवूडमध्ये तिला मिळलेल्या वाईट वागणुकीचा खुलासा तिने केला. यावेळी तिने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या स्त्री-पुरुष भेदभाव, त्यांना  पुरुष कलाकारांपेक्षा कमी पगार कसा मिळतो, सेटवर तासनतास थांबावे लागले आणि त्याच्या रंगाबद्दल आणि बॉडी शेमिंगबद्दल  कटू गोष्टी ऐकाव्या लागतात. असा खुलासा केला आहे. हेही वाचा - झक्कास! दीपिका पदुकोण आता साकारणार लेडी सिंघम; रोहित शेट्टीची मोठी घोषणा प्रियंका चोप्रानं त्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की,‘‘मला बॉलीवूडमध्ये कधीच एखाद्या अभिनेत्याच्या बरोबरीनं समान दर्जा मिळाला नाही. अभिनेत्याला जेवढं मानधन दिलं जात होतं त्याच्या फक्त 10 टक्के मला दिलं जायचं. ही खूपच मोठी तफावत होती. आणि याचमुळे बॉलीवूडमध्ये कितीतरी महिला या सगळ्या गोष्टींसोबत आजही डील करत आहेत. मला माहीत आहे मी आजही जर बॉलीवूडमध्ये एखाद्या हिरोसोबत काम केलं तर माझ्यासोबतही तेच घडेल. माझ्या जनरेशनच्या सगळ्या अभिनेत्रींनी यासंदर्भात आवाज उठवला आहे. पण अद्यापही यात सुधारणा झालेली दिसत नाही.

संबंधित बातम्या

प्रियंका चोप्रानं सेटवर आपल्यासोबत लोक कसे वागायचे याचा देखील खुलासा केला आहे. ती म्हणाली,‘‘मला वाटायचं आपले सीन नसतील तरी सेटवर आपण हजर असायला हवं. आणि तासनतास बसून सीनची वाट पाहणं मला योग्य वाटायचं. पण माझ्या सिनेमाचा हिरो मात्र आधीच सांगायचा,जेव्हा सीन लागतील तेव्हा मी सेटवर दिसेन’’. आपण जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा बॉडी शेमिंगचा सामना देखील आपल्याला करायला लागला हे देखील प्रियंकानं नमूद केलं. प्रियंकानं मुलाखतीत सांगितलं की,‘‘मला ‘काळी मांजर’ ,‘सावळी’ म्हणूनही हिणवायचे. माझा बोलण्याचा अर्थ हा आहे की,भारतात सावळ्या रंगाचा काय अर्थ असेल जिथे जवळपास सगळेच त्या रंगाचे असतात. मला वाटायचं, मी जास्त सुंदर नाही. मला खूप मेहनत करावी लागेल. एवढंच नाही मला हे देखील वाटायचं की माझ्या गोऱ्या सहकलाकारांच्या तुलनेत मी जरा जास्त हुशार आहे. पण मग मला सगळं कालांतराने ठीक आहे जे सुरु आहे ते असं वाटायला लागलं होतं….सगळं नॉर्मल बनत गेलं काळानुसार…’’

प्रियांका चोप्राने 2002 मध्ये तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. थज्मिझान या तमिळ चित्रपटातून त्याने पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. त्याने अनेकदा स्वतःसाठी आव्हानात्मक भूमिका निवडल्या आणि आपल्या चमकदार कामगिरीने देशातच नाही तर परदेशातही नाव कमावले. पण, बॉलीवूडमध्ये आलेले कटू अनुभव ही अभिनेत्री आजही विसरू शकलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या