प्रियांका चोप्रा
मुंबई, 31 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत आहे. प्रियांका चोप्राने जागतिक पातळीवर आपली खास ओळख निर्माण केली आहे. प्रियांका एक उत्तम अभिनेत्री तर आहेच परंतु ती आता तितकीच उत्कृष्ट आईदेखील आहे. प्रियांका सतत आपल्या लेकीसोबत वेळ घालवताना आणि मजामस्ती करताना दिसून येते. मात्र अद्याप प्रियांकाने लेक मालतीचा चेहरा दाखविला नव्हता. परंतु आता अभिनेत्रीने आपल्या मुलीचा चेहरा दाखवत जगाला तिची ओळख करुन दिली आहे. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियांका अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिला चित्रपट हिट करण्यासाठी कोणत्याही सुपरस्टारची गरज भासत नाही. तिचा स्वतःचा एक अफाट मोठा चाहतावर्ग आहे. प्रियांकाने विविध धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये आपला जादू पसरवत आहे. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. (हे वाचा: Preity Zinta B’day: अंडरवर्ल्ड डॉनसोबत भिडली होती प्रीती झिंटा; तुम्हाला माहितेय का अभिनेत्रीचा ‘तो’ किस्सा? **)** प्रियांका चोप्रा अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिचे चाहते तिला पडद्यावर प्रचंड मिस करत असतात. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती सतत आपल्या पोस्टच्या माध्यमातून सर्वांना आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते. प्रियांका सध्या एका लेकीची आई बनली आहे. ती आपलं मातृत्व अतिशय आनंदाने जगत आहे. अभिनेत्रीने सरोगेसीद्वारे मुलीला जन्म दिला आहे.
अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रियांकाच्या लेकीला पाहण्याची उत्सुकता होती. प्रियांकानेदेखील अनुष्का आणि सोनमप्रमाणे नो फोटो पॉलिसी पाळली होती. त्यामुळे तिची मुलगी कशी दिसते हे अद्याप कोणालाही माहिती न्हवत नव्हतं.
मात्र आता प्रियांकाने स्वतः आपल्या लेकीचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. प्रियांकाने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान आपल्या लेकीला घेऊन गेलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुलगी मालतीचा चेहरा स्पष्ट दिसून येत आहे.
प्रियांका चोप्रा आणि जोनस गेल्यावर्षी सरोगेसीद्वारे आईबाबा बनले आहेत. त्यांना एक गोंडस लेक आहे. या सेलिब्रेटी कपलने आपल्या लेकीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे.जन्मानंतर प्रियांकाची मुलगी फारच कमकुवत होती. तिला जवळजवळ महिनाभर रुग्णालयातच ठेवण्यात आला होतं. मात्र आता ती एक वर्षाची झालीये आणि फारच उत्तम आहे.