JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बोटीवर प्रियांकाने निक जोनसला सर्वांसमोर केलं KISS, PHOTO VIRAL

बोटीवर प्रियांकाने निक जोनसला सर्वांसमोर केलं KISS, PHOTO VIRAL

priyanka chopra nick jonas या रोमँटिक फोटोआधी प्रियांकाचा जंपसूट चर्चेत होता. प्रियांकाने राखाडी रंगाचा जंपसूट आणि पांढऱ्या रंगाचे बुट घातले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पॅरिस, 25 जून- देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या पॅरिसमध्ये फिरत आहेत. इथे दोघं जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या ख्रिश्चन लग्नाला उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या धावपळीमध्येही प्रियांका आणि निकने एकमेकांसाठी वेळ काढला. मग तो छोटासा रोमँटिक वॉक असो किंवा डिनर दोघं एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. नुकतेच ते बोटीवर रोमँटिक राइड करताना दिसले. दोघांचे बोटीवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये निक आणि प्रियांका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. दोघांच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर दोघं नेहमीच स्टाइलिश अंदाजात दिसतात. प्रियांका आणि निक यांना कुठेही पाहिलं तरी त्यांचा लुक नेहमीच ऑन पॉइंट असतो. पण सध्या सोशल मीडियावर त्यांच्या कपड्यांपेक्षा त्यांच्यातील किसचीच चर्चा जास्त आहे. शपथ घेतल्यावर या दिग्गज नेत्याच्या पाया पडली नुसरत जहां शूटिंग दरम्यान, उघडपणे सिगरेट ओढणं अभिनेत्याला पडलं महाग, पोलिसांनी केलं अटक या रोमँटिक फोटोआधी प्रियांकाचा जंपसूट चर्चेत होता. प्रियांकाने राखाडी रंगाचा जंपसूट आणि पांढऱ्या रंगाचे बुट घातले होते. तुम्ही या जंपसूटची किंमत ऐकून थक्क व्हाल. तिने परिधान केलेल्या जंपसूटची किंमत तब्बल १ लाख ३ हजार ९५१ रुपये एवढी आहे. तर तिने घातलेल्या पांढऱ्या बुटांची किंमत ६५ हजार ७०८ रुपये आहे. एवढंच नाही तर, तिच्याकडील Christian Dior book tote oblique या हॅण्डबॅगची किंमत १ लाख ८७ हजार ७३९ रुपये एवढी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या