लॉस एंजेलिस, 2 मे- ग्लोबल स्टार झालेली प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. शिवाय मीडियाचं लक्ष आपल्याकडे कसं वेधून घ्यायचं हे दोघांनाही चांगल्याप्रकारे जमतं. नुकतेच दोघं सार्वजनिक ठिकाणी किस केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आले आहेत. निक आणि प्रियांकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात निक एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सर्वांसमोर प्रियांकाला किस करताना दिसत आहे. दोघांचं हे खुल्लम खुल्ला प्रेम सर्वांनाच पसंत पडत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. India’s Most Wanted Trailer- मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन कपूर जेव्हा देशासाठी जीवही द्यायला तयार होतो
लॉस अँजेलिस येथील बिलबोर्ड म्युझिक अवॉर्डमधील हा व्हिडीओ आहे. या पुरस्कार सोहळ्यात निक आणि जोनस ब्रदर्स यांनी ‘केक बाय दी ओशन’ या गाण्यावर परफॉर्म केलं. जोनस ब्रदर्सच्या या गाण्याने पुरस्कार सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली होती. परफॉर्म करताना अचानक निक स्टेडवरून खाली आला आणि गिटार वाजवत प्रियांकाच्या दिशेने नाचत गेला. प्रियांकानेही त्याच्या गाण्यावर ताल धरला होता. तेव्हाच दोघांनी एकमेकांना किस केलं. दोघांचा हा क्यूट रोमान्स पाहून सुरुवातीला सर्वांना आश्चर्य वाटलं पण नंतर साऱ्यांनीच त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं. मतदान न करण्याच्या प्रश्नावर भडकला अक्षय कुमार, दिलं ‘हे’ उत्तर
…और प्यार हो गया ! ‘या’ व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी प्रियांका या कार्यक्रमात नवऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी आली होती. निकच्या पूर्ण परफॉर्मन्सवेळी ती बेधूंद होऊन नाचत होती. यावेळी प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा स्लिट गाउन घातला होता. यात ती फारच मादक दिसत होती. तर निकने चेक डिझाइनचा कोट आणि पॅन्ट घातली होती. हे हॉट कपल जेव्हा कार्यक्रमात आलं तेव्हा आपसूक सारेच कॅमेरे त्यांच्याकडे वळले.