मुंबई, 19 जानेवारी- हिंदी व मराठी मालिकविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठे (priya marathe ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रिया मराठे किती फूडी आहे हे तिचं इन्स्टा अंकाऊट पाहिल्यावरचं लक्षात येते. शिवाय ती फक्त फूडी नाही तर उत्तम कुक देखील आहे. लॉकडाऊनच्या काळात तिनं बनवलेल्या अनेक पदार्थचे फोटो शेअर करत असत. आता मग काय स्वयंपाक म्हटलं की, बाजाराहाट आलाच. प्रिया देखील यासाठी बाजारात गेली आहे. तिनं याचा एक व्हिडिओ (priya marathe latest video ) देखील शेअर केला आहे. प्रिया मराठेने भाजी आणि फळ मार्केटचा ( vegetable and fruit market ) एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, अशी एक जाग जी मला आणि माझी आईला खूप आवडते..ती म्हणजे भाजी आणि फळ मार्केट.. प्रिया आईसोबत भाजी घ्यायला बाजारात गेली आहे. यावेळी तिनं आईसोबत भाजी घेतल्यानंतर नारळ पाणी पिले आहे. शिवाय तिनं बाजारातून काय काय घेतलं आहे हे देखील या व्हिडिओत दिसत आहे.
प्रियानं बाजरातून काकडी, सिमला मिरची, संत्री, केळी सोबतट लाल लाल टोमॅटो घेतले आहेत. या व्हिडिओला तिनं मळ्याला या मळेवाली भेटलीच नाई…आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय..संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचे सुंदर गाण या व्हिडिओला तिनं जोडलं आहे. हा व्हिडिओ पाहून आपण देखील बाजारातच आहे का असं वाटत आहे. चाहत्यांना देखील हा व्हिडिओ आवडला आहे. त्यांनी देखील हार्ट इमोजी पोस्ट करत पसंती दर्शवली आहे. वाचा- बिग बॉस मराठी फेम आदिश वैद्यला गर्लफ्रेंडने काढलं घराबाहेर ? का ते पाहा…. प्रिया मराठे नुकतीच झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत दिसली होती. तसेच ती ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत देखील दिसली होती. मराठीसोबत प्रिया मराठे हिंदी मालिकेत देखील काम करताना दिसते. प्रिया मराठेने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं यानंतर चार दिवस सासूचे, तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली. याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकाविश्वात पाऊल ठेवले. त्यानंचर ती पवित्र रिश्ता मालिकेत अर्चना म्हणजे अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली.