JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priya Bapat: प्रिया बापटचं डेली रुटीन माहितेय का? अभिनेत्री शेअर केला व्हॅनिटीमधील खास VIDEO

Priya Bapat: प्रिया बापटचं डेली रुटीन माहितेय का? अभिनेत्री शेअर केला व्हॅनिटीमधील खास VIDEO

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकताच प्रियानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात

priya bapat

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकताच प्रियानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. प्रियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं दिवस कसा सुरु होतो आणि मेकअप व्हॅनमध्ये कसा टाईमपास केला जातो याची एक झलक शेअर केलेल्या व्हिडीओमधून दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. याशिवाय व्हिडीओवर अनेक भन्नाट कमेंट येत आहे. हेही वाचा -  Sonalee Kulkarni: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा किलर Look, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ती हिंदी वेबसिरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे प्रियाचा चाहता वर्ग काही कमी नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबत प्रिया तिच्या हटके फॅशनमुळेही (Priya bapat new look) चर्चेत असते. नेहमीच वेगळ्या लूकमध्ये ती फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते.

संबंधित बातम्या

दरम्यान, प्रियाला फिटनेसचही खूप वेड आहे. प्रिया जेवढी तिच्या कामविषयी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या फिटनेसविषयीही चर्चा होत असते. ती फिटनेसविषयीही खूप जागरूक आहे. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामध्ये ती तिच्या फिटनेस दाखवत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या