JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'स्वतःसोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं...'; प्रिया बापटची नवी पोस्ट चर्चेत

'स्वतःसोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं...'; प्रिया बापटची नवी पोस्ट चर्चेत

प्रिया बापटनं नुकताच इन्स्टाग्रामवर (Priya bapat new post) एक फोटो शअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

जाहिरात

Priya Bapat

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : अभिनेत्री प्रिया बापट (Actress Priya Bapat)सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेली पहायला मिळते. प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ती हिंदी वेबसिरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे प्रियाचा चाहता वर्ग काही कमी नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबत प्रिया तिच्या हटके फॅशनमुळेही (Priya bapat new look) चर्चेत असते. नेहमीच वेगळ्या लूकमध्ये ती फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते. प्रिया सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. प्रियानं नुकताच इन्स्टाग्रामवर (Priya bapat new post) एक फोटो शअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हे कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘स्वतःसोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं आहे. नवीन लोकांशी संवाद साधा. चांगलं अन्न खा. खूप दिवसांनी हे केलं.’, असं कॅप्शन प्रियानं फोटोसोबत लिहिलं आहे. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. फोटोवर लाईक्सचा भडिमार होत असून प्रियाचं कौैतुकही होत आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, प्रियाला फिटनेसचही खूप वेड आहे. प्रिया जेवढी तिच्या कामविषयी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या फिटनेसविषयीही चर्चा होत असते. ती फिटनेसविषयीही खूप जागरूक आहे. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामध्ये ती तिच्या फिटनेस दाखवत असते. हेही वाचा - Shreya Bugde Post: श्रेया बुगडेने फ्लॉन्ट केली आपली पहिली नोजपिन; फोटो शेअर करत पाहा काय म्हणाली अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा जोडीदार उमेश कामत (umesh kamat)दोघंही कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. बाकी जोडप्यांपेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे कारण ते 10 वर्षाहून अधिक काळ एकमेकांसोबत आहेत. दोघांची प्रेमाची स्टोरीही मस्त असून ते नेहमीच ‘कपल गोल्स’ देताना दिसतात. कामाविषयीही ते तितकेच सिरिअस असतात. दोघांनी एकत्रही काम केलं आहे. कामासोबत त्यांनी खासगी आयुष्यातही समतोल साधलेला पहायला मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या