JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रंगभूमीचा दगडूशेठपासून श्रीगणेशा : प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्ट करत दिली खूशखबर

रंगभूमीचा दगडूशेठपासून श्रीगणेशा : प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्ट करत दिली खूशखबर

आता नाट्यप्रेमींसाठी देखील एक गुड न्यूज आहे. कारण खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर लवकरच मराठी रंगभूमीवरील पडदा वर जाणार असल्याची माहिती प्रशांत दामले यांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे , 11 ऑक्टोबर : अभिनेते प्रशांत दामले हे (Prashant Damle) लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत यांची विनोदीबुद्धी प्रेक्षकांची मने जिंकते. मराठी नाटक आणि खवय्यांसाठीचे खास कार्यक्रम हे ते नेहमीच रंगवतात. प्रशांत हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता त्यांनी एक पोस्ट करत सर्व नाटकप्रेमी मंडळींना खूशखबर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्र असेल किंवा आणि कोणते क्षेत्र सर्वच काही ठप्प झाले होते आता मात्र सर्व काही पूर्व पथावर येताना दिसत आहे. सर्व व्यवहार सुरू होत आहेत. आता नाट्यप्रेमींसाठी  **(theatre)**देखील एक गुड न्यूज आहे.  कारण  खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर लवकरच मराठी रंगभूमीवरील पडदा  (drama) वर जाणार असल्याची माहिती प्रशांत दामले यांनी दिली आहे. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर आता मराठी रंगभूमीवरील पडदा वर जाणार आहे. परत रंगमंच प्रकाशाने उजळून जाणार आहे आणि रसिकांचे रंजन करायला सज्ज होणार आहेत- तुमचे लाडके नाट्यकर्मी. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘तू म्हणशील तसं’ या दोन सदाबहार नाटकांचे कलाकार उद्या श्रींमत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत रंगभूमिवरील एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा करणार आहेत ! ह्या नाटकांना, रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत राहो हीच त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना!, अशा अशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची मुख्य भूमिका असलेले एका लग्नाची गोष्ट हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक आहे.कोरोनामुळे सर्व बंद होते मात्र आता हळूहळू सर्व सुरू होत आहे. वाचा : भार्गवी चिरमुलेने Navratri निमित्त नेसलेल्या ‘या’ साडीचं महत्त्व माहितेय का?   आता लवकरच रसिकांना ही नाटके पाहता येणार आहेत. त्यामुळे नाटकप्रेमींच्यात आनंदाचे वातावरण दिसत आहे. काहींनी कमेंट करत प्रशांत दामले यांचे अभिनंदन केले आहे.कोरोनामुळे नाट्यगृहे बंद असल्याने नाट्यवेडे रसिक प्रेक्षक दर्जेदार नाटकांना मुकत होते. आता मात्र तस होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या