Prasad oak
मुंबई, 26 ऑगस्ट : अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका अक्षरशः जगला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नुकतचं झी मराठीवर धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तेव्हाही प्रेक्षकांनी या चित्रपटाला अफाट प्रतिसाद दिला. आज 26 ऑगस्ट रोजी आनंद दिघेंची पुण्यतिथी आहे. त्यादिवशी प्रसाद ओक याने एक विशेष घोषणा केली आहे. प्रसाद ओक हा एक गुणी अभिनेता आहे. तो उत्तम अभिनेता तर आहेच त्याशिवाय कमालीचा दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याने दिग्दर्शित केलेले ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले. या दोन क्षेत्रात कौशल्य गाजवल्यानंतर आता प्रसाद ओक नवीन क्षेत्रात पाउल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच लेखक या रूपाने आपल्या भेटीस येणार आहे. प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित “माझा आनंद” हे पुस्तक लिहिलं आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल. आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिवशी हि आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या प्रसाद ओकने आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिवशी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं आहे कि, ‘मा. दिघे साहेबांना विनम्र अभिवादन…!!! लवकरच #धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटा इतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!!’ हेही वाचा - Alia Bhatt : परी म्हणू की सुंदरा! आलियाच्या चेहऱ्यावर दिसतेय प्रेग्नन्सीची चमक दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ओफिसवर सुपरहिट झाला होता. आता त्यांचं चरित्र पुस्तकरूपातही वाचायला मिळणार आहे.