prarthana behere
मुंबई, 16 ऑगस्ट : मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Parthana Behere)कायम चर्चेत असते. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. प्रार्थना तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती तिच्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा प्रकाश झोतात आलीये. अशातच प्रार्थनानं तिच्या नणंदेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. प्रार्थना बेहरेची नणंद पल्लवी भीडेचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचं औचित्य साधत प्रार्थनानं नणंदेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रार्थनानं पल्लवीसोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर शेअर केला आहे. यामध्ये दोघींचे स्पेशल बॉन्डिंग पहायला मिळतंय. याशिवाय प्रार्थनानं कॅप्शनमध्येही तिच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. प्रार्थनानं म्हटलं की, ‘सर्वात सुंदर बहिण असणाऱ्या माझ्या नणंदेला आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’.
प्रार्थना बेहेरेचे अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांची ओळख झाली. त्यानंतर प्रार्थना आणि अभिषेक 14 नोव्हेंबर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले. प्रार्थना आणि अभिषेक मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून देखील ओळखले जाते. हेही वाचा - Shehnaaz Gill: पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका; अभिनेत्रीला खर्च करावे लागले इतके रुपये दरम्यान, प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा कामत ही भूमिका करत आहे. या मालिकेत श्रेयश तळपदेसोबत ती मुख्य भूमिकेत आहे. दोघांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत असतं. प्रार्थनाने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मोठ्या पडद्याकडून आता ती छोट्या पडद्याकडे वळली आहे.