JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Prarthana Behere: प्रार्थना बेहरेच्या आयुष्यात अखेर आला 'तो' क्षण; म्हणाली 'आज 15 वर्षानंतर....'

Prarthana Behere: प्रार्थना बेहरेच्या आयुष्यात अखेर आला 'तो' क्षण; म्हणाली 'आज 15 वर्षानंतर....'

प्रार्थना बेहरेचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. नुकतीच प्रार्थनाने एक पोस्ट केलीय जी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात

प्रार्थना बेहरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी :  प्रार्थना बेहरे ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या मोहक हास्यावर सगळेच फिदा होतात. चित्रपटांमध्ये नाव कमावणाऱ्या प्रार्थनाने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून छोट्या पडदाही चांगलाच गाजवला. या मालिकेत प्रार्थनाने साकारलेली नेहा कामात महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे प्रार्थनाचं फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढलं. प्रार्थना सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. नुकतीच प्रार्थनाने एक पोस्ट केलीय जी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रार्थना बेहेरेचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल 15 वर्षांनंतर प्रार्थनाची ही इच्छा पूर्ण झाली आहे. प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. प्रार्थना अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. प्रार्थना उत्तम डान्स करते. तिला अनेकदा डान्स करण्याची संधी मिळते. पण नुकतंच तिने शास्त्रीय नृत्यप्रकार सादर केला. तिचं हे स्वप्न होतं आणि ते 15 वर्षानंतर पूर्ण झालं आहे. Sankarshan Karhade: ‘मी घेत नव्हतो पण…’ संकर्षणने सांगितला नाटकाच्या प्रयोगानंतर घडलेला ‘तो’ प्रसंग प्रार्थनाने याबाबत नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने याविषयीस सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थना तिच्या भरतनाट्यम नृत्याच्या सादरीकरणापूर्वी तयारी करताना दिसत आहे. हा नृत्यप्रकार सादर करताना ती फारच आनंदी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने पायात घुंगरू बांधलेला फोटो शेअर करत ‘खूप वर्षानंतर’ असं लिहिलं होतं. तेव्हापासूनच तिच्या चाहत्यांना ती नक्की काय करणार याबाबत उत्सुकता होती. आता अखेर प्रार्थनाने डान्सचा व्हिडीओ पोस्ट करत गुपित उघडलं आहे.

संबंधित बातम्या

प्रार्थनाचा हा पारंपरिक लूक पाहून चाहते आणि कलाकार तिच्यावर फिदा झाले आहेत. प्रार्थनाने टाकलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तसेच चाहत्यांसह अनेक कलाकार देखील या व्हिडिओवर कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर, ‘हे कधी शिकलास, तू फारच टॅलेंटेड आहेस, तू सर्वगुणसंपन्न आहेस’ अशा कमेंट केल्या आहेत.

प्रार्थनाने छोट्या पडद्यावरूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिच्या ‘पवित्र रिश्ता’ या पहिल्या मालिकेतच तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने मोठा पडदा गाजवला. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यासारखे हिट चित्रपट केले. पण प्रेक्षकांशी पुन्हा नाळ जोडण्यासाठी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. आता ही मालिका संपली असली तरी तिने साकारलेली नेहा कामत प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. प्रार्थनाच्या वर्कफ्रंट  विषयी सांगायचं तर ‘माझी तूझी रेशीमगाठ’ या हिट मालिकेनंतर प्रार्थना प्रसाद ओक सोबत लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. तिला आता नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या