JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आणि 'तो' सीन असलेला भाग काल प्रदर्शित झाला…' आधी ट्रोल आणि आता प्राजक्ता माळीचं कौतुक

'आणि 'तो' सीन असलेला भाग काल प्रदर्शित झाला…' आधी ट्रोल आणि आता प्राजक्ता माळीचं कौतुक

मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी रानबाजारमुळे ट्रोल होत आहे. आता मात्र तिचं अचानक कौतुक होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जून- अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajaktta Mali ) मागच्या काही दिवसांपासून तिच्या रानाबाजार या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. रानबाजारमधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक झालं. पण नेटकऱ्यांना तिचा बोल्ड अंदाज रूचला नाही. यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. असं जरी असलं तरी या सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच प्राजक्तानं य़ा सीरिजबद्दल एक पोस्ट केली आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. या सिरीजमधील तिच्या आवडत्या सीनबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. प्राजक्ता माळीनं रानबाजार मधील तिचे  दोन फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, आणि जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… (one take one shot) 🎯#raanbaazaarजरूर बघा आणि प्रतिक्रिया द्या. @planetmarathiott 🎯 असं म्हणत तिनं तिच्या आवडत्या सीनविषयी तर सांगितले आहेच. शिवाय रानबाजार चे एकूण 8 भाग आलेत, फक्त 2 राहिल्याची कल्पना देखील प्रेक्षकांना दिली आहे. वाचा- ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून उर्मिला एक्झिट घेणार की नाही? झाला खुलासा प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट करत प्रेक्षकांनी देखील तिच्या अभिनयाविषयी मत नोंदवलं आहे. एकानं म्हटलं आहे की,यात फक्त आमची जीवाभावाची अभिनेत्री प्राजक्ता खूप आवडली आणि तिने केलेला मनापासून काम हीच तिची पोचपावती आहे. आताच्या अनेक अभिनेत्री या झाल्या परंतु प्राजक्ता माळी यांच्यासारखीच अभिनेत्री झाली नाही आणि होणार नाही.❤️❤️❤️😍🔥 तर आणखी एकानं म्हटलं आहे की,उच्च दर्जाचा अभिनय आहे तूझा आणि खूप उत्तम वेब सिरीज 👏👏♥️🌹 आणखी एकानं अशीच कमेंट करत म्हटलं आहे की,प्राजू खरंच खूप उत्तम अभिनय तू या वेबसिरीजमध्ये केलंय..! आम्हाला fans ना आणि fan club’s ना तुझा खूप अभिमान वाटतो…तू चौकटी बाहेर जाऊन काही वेगळं केलंय खूप आनंद होतो आहे..खूप खूप शुभेच्छा…! 😍👏🔥🙌❤️❤️❤️ खरंच one of the best scene …🔥🔥#lotsoflove #prajuarmy अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी प्राजक्ता माळीचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या

मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. पण कालचा भाग प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून तिचं कौतुक होत आहे. कमेंट बॉक्स प्राजक्ताच्या कौतुकानं भरून गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या