JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतच्या आत्महत्येनंतर म्हणे अंकिताने डिलीट केली 'ती' पोस्ट; सोशल मीडियावर सुरू आहे चर्चा

सुशांतच्या आत्महत्येनंतर म्हणे अंकिताने डिलीट केली 'ती' पोस्ट; सोशल मीडियावर सुरू आहे चर्चा

पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यान अंकिता व सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्याचं नातं लग्नापर्यंतही पोहोचलं होतं..मात्र

जाहिरात

पुढे वाचा... फक्त सुशांतच नाही ‘या’ बॉलिवूड कलाकारांनीही डिप्रेशनमधून उचललं आत्महत्येचं पाऊल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून : रविवारी दुपारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. पोलिसांनी केलेल्या तपासातून नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत उलटसुटल चर्चा सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येचा त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला जबरदस्त झटका बसल्याचे सांगितले जात आहे. त्यात अंकिताची एक कथित पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतच्या निधनाच्या काही तास आधी अंकिताने ही कथित पोस्ट सोशल अकाऊंटवरुन शेअर केली होती. पण सुशांतच्या मृत्यूनंतर लगेचच तिने ही पोस्ट डिलीट केली, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तिच्या पोस्टचा एक स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने ही पोस्ट का डिलीट केली याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. झूम डिजिटल नेही यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात अनेक नेटिझन्स अंकिताकडून ही पोस्ट डिलीट करण्यामागील कारणं विचारत आहे. मात्र अद्याप अंकिताने या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काय आहे ती कथित पोस्ट? देव काही लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो, कारण देवाने त्या गोष्टी ऐकल्या असतात ज्या लोकांनी ऐकलेल्या नसतात. मात्र सध्या ही पोस्ट अंकिताच्या अकाऊंटवर दिसत नाही. मात्र या पोस्टचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवरुन अनेक चर्चा सुरू आहे.

सुशांतच्या आत्महत्येमुळे अंकिताला मोठा धक्का बसला आहे. अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतसोबत एकत्र काम केले होते. त्यानंतर अनेक वर्षे ते रिलेशनशीपमध्ये होते. सुशांत सिंहच्या आत्महत्येमुळे तिला जबरदस्त धक्का बसला आहे. दोघे काही वर्षे लिव्हइनमध्ये राहत असल्याचीही चर्चा होती.

संबंधित बातम्या

ही कथित पोस्ट अंकिता लोखंडेची आहे की नाही याबाबत नेमकी माहिती हाती आलेली नाही. याबाबत अधिकृत माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल. हे वाचा- सुशांत सिंहला शेवटचा मेसेज करताना या अभिनेत्याला आला होता संशय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या